महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

rains in Rainfall Koyna : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे आगमन

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे आगमन ( Arrival rains in Koyna ) झाले आहे. गेल्या चोवीस तासात कोयनानगर येथे 8 मिमी. नवजा येथे 17 मिमी. तर महाबळेश्वरात 9 मिमी. ( Mahabaleshwar Rainfall ) पावसाची नोंद झाली आहे. सध्या धरणात 17.64 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक असून धरणातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग ( Discharge 2100 cusecs water ) नदीपात्रात सुरू आहे.

कोयना धरण
Koyna Dam

By

Published : Jun 11, 2022, 12:14 PM IST

सातारा - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे आगमन झाले आहे. गेल्या चोवीस तासात कोयनानगर येथे 8 मि. मी., नवजा येथे 17 मि. मी. तर महाबळेश्वर येथे 9 मि. मी. पावसाची ( Mahabaleshwar Rainfall ) नोंद झाली आहे. सध्या धरणात 17.64 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक असून धरणाच्या पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे.

पावसाच्या आगमनाने पर्यटकांना दिलासा -कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वरमध्ये ( Mahabaleshwar Rainfall ) पावसाचे आगमन झाले आहे. शुक्रवारपासून पावसाची रिमझिम सुरू ( drizzle rain continues ) झाल्याने पर्यटक सुखावले आहेत. विकेंडला कोयना, महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी ( tourists Crowd in Mahabaleshwar) होते. या पर्यटकांना आता पावसाचा आनंद घेता येऊ लागला आहे. कोयनानगर येथे 8 मि. मी. नवजा येथे 17 मि. मी. तर महाबळेश्वरमध्ये 9 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.


चेरापुंजीत पावसाची वर्दी -कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील नवजा येथे सर्वाधित पाऊस पडतो. त्यामुळे नवजाला महाराष्ट्राची चेरापुंजी ( Cherrapunji of Maharashtra ) म्हटले जाते. नवजा पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात सर्वाधिक 17 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे छोटे धबधबे ( Small waterfalls ) प्रवाहीत होऊ लागले आहेत.

हेही वाचा-मुंबईत पावसाळ्याची चाहूल, रात्रभर पावसाची रिपरिप वातावरणात गारवा

ABOUT THE AUTHOR

...view details