महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Girls Marriage Age : मुलींच्या लग्नाचे वय वाढवू नये, अन्यथा गैरप्रकार वाढतील - शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील

शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील ( Farmers Leader Raghunath Patil ) यांनी मुलींच्या लग्नाचे वय वाढविण्यास विरोध केला ( Proposal To Increase Girls Marriage Age ) आहे. मुलीच्या लग्नाचे वय वाढवल्यास शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाला अडचणी ( Difficulties in marriage of farmers children ) येतील. तसेच गैरप्रकार वाढतील, असा दावा त्यांनी केला आहे.

शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील
शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील

By

Published : Apr 15, 2022, 8:51 PM IST

सांगली - केंद्र सरकारने बालविवाह कायद्यात बदल न करता मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा वाढवू नये,अशी मागणी करत 21 वयोमर्यादेला विरोध केला ( Proposal To Increase Girls Marriage Age ) आहे.तसेच मुलींच्या विवाह वयात वाढ केल्यास शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाला अडचणी ( Difficulties in marriage of farmers children ) येतील. शिवाय समाजात अनेक गैरप्रकार वाढतील,असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील ( Farmers Leader Raghunath Patil ) यांनी दिला आहे.


मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा वाढणार :केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाकडून 21 डिसेंबर 2019 रोजी संसदेमध्ये "बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006" मध्ये सुधारण्यासाठी विधेयक मांडण्यात आले आहे. यामध्ये देशातील वेगवेगळ्या समाजात असणाऱ्या विवाह कायद्यात सुधारणा करण्याबरोबर प्रामुख्याने मुलींच्या लग्नाची असणारी 18 वर्षाची वयोमर्यादा वाढवून 21 वयोमर्यादा करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. सदरचे विधायक सरकारने अभ्यास करण्यासाठी केंद्रीय स्थायी समितीकडे पाठवले आहे. मात्र यातील मुलींच्या वाढवलेल्या लग्न वयोमर्यादेला शेतकरी संघटनेकडून विरोध दर्शवण्यात आला आहे.


वयोमर्यादेला शेतकरी संघटनेचा विरोध :शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी मुलींच्या वाढवण्यात येणाऱ्या लग्नाच्या वयोमर्यादेला आक्षेप घेतला आहे. याबाबतच पत्र देखील केंद्रीय स्थायी शिक्षण समिती अध्यक्ष खासदार डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांना पाठवले आहे. यामध्ये पाटील यांनी मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा वाढवू नये, अशी मागणी केली आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या मुलांना आधीच लग्नासाठी मुली मिळत नाहीत. 30-35 वय झाले तरी लग्नासाठी मुली मिळत नाहीत. सरकारने आधीच शेती तोट्यात नेऊन ठेवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत लग्न करायला मुली तयार होत नाहीत, असे त्यात म्हटले आहे.

मुलींवर अन्याय, शिवाय गैरप्रकार वाढणार :समजा आज घडीला अठरा वर्षाच्या वयाच्या मुलींची संख्या महाराष्ट्रात 10 लाख आहे. वयोमर्यादा जर 21 केली तर, 18,वर्षाच्या मुलीला 3 वर्षे, 19 वयाच्या मुलीला 2 आणि 20 वर्षाच्या मुलीला 1 वर्ष थांबावे लागेल. अशाप्रकारे मुलींच्या संख्या 40 लाखांचा घरात पोहचेल. त्यामुळे लग्नाच्या वयात असलेल्या या मुलींवर अन्याय होईल. त्याचबरोबर जर का मुलींची योग्य वयात, वेळेत लग्न केले नाहीत तर, गैरप्रकार वाढून प्रेमविवाह, पळून जाणे, गर्भपात, अनारस संतान अशा अनेक चुकीच्या घटना घडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जन्मदात्या आई-वडिलांची चिंता वाढणार आहे.


ही तर व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा :देशात आज 18 वर्ष पूर्ण झाल्यावर गाडी चालवण्याचा परवाना देण्यात येतो. सज्ञान म्हणून सहीचा अधिकार देतो. देश चालवण्याचा हक्क म्हणून मतदानाचा अधिकार देतो. मग अठराव्या वर्षी आपला जोडीदार ठरवण्याचा अधिकार सरकारने आपल्याकडे ठेवणे योग्य नाही. जर मुलींची विवाह वयोमर्यादा वाढवली त्यानुसार होणारे विवाह योग्य रीतीने चालणार नाहीत. ज्यांना करिअर करायच आहे, ज्यांना नोकरी करायची आहे, त्यांनी लग्नाचा निर्णय स्वतः घ्यायचा हक्क आहे. मात्र अशाप्रकारे लग्नाच्या वयाचा हक्क सरकारने आपल्याकडे घेऊन कायद्याच्या कचाट्यात लग्नाला आणून व्यक्तिस्वातंत्र्यावर सरकारने गदा आणू नये. जगात लग्नाचे वय 18 आहे. त्यामुळे सरकारने मुलीच्या वयाची मर्यादा वाढवू नये, ती जशी आहे, तशीच ठेवावी अशी, मागणी रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे.



हेही वाचा : मुलींच्या लग्नाचे वय 21 वर्ष करावे का? यासाठी महाराष्ट्रात चर्चा व्हावी - सुप्रिया सुळे

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details