महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

104 वर्षांच्या वृध्दाची कोरोनावर मात, टाळ्यांच्या गजरात दिला डिस्चार्ज - सातारा कोरोना

कराडमधील कृष्णा हॉस्पिटलच्या कोविड वॉर्डमध्ये 10 दिवस उपचार घेऊन रघुनाथ जाधव (रा. इंदोली, ता. कराड) या 104 वर्षांच्या वृध्दाने कोरोनावर मात केली आहे. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ आणि कोरोनामुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले.

104-year-old corona free
104-year-old corona free

By

Published : Jun 15, 2021, 3:40 PM IST

Updated : Jun 15, 2021, 4:06 PM IST

कराड (सातारा) -कराडमधील कृष्णा हॉस्पिटलच्या कोविड वॉर्डमध्ये 10 दिवस उपचार घेऊन रघुनाथ जाधव (रा. इंदोली, ता. कराड) या 104 वर्षांच्या वृध्दाने कोरोनावर मात केली आहे. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ आणि कोरोनामुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले.

104 वर्षांच्या वृध्दाची कोरोनावर मात

कोरोना साथीच्या सुरुवातीपासून पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी कृष्णा हॉस्पिटलने सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून मोठा दिलासा दिला आहे. कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन आजवर चार हजारहून अधिक कोरोनाबाधित रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कराड तालुक्यातील इंंदोली गावचे 104 वर्षे वय असलेले रघुनाथ जाधव यांची कोविड चाचणी पॉझिटीव्ह आल्याने ते उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटलच्या कोविड वॉर्डमध्ये दाखल झाले होते. वयोमानामुळे त्यांच्यावर उपचार करण्याचे मोठे आव्हान कृष्णा हॉस्पिटलमधील डॉक्टरांसमोर होते. डॉक्टरांनी हे आव्हान यशस्वीपणे पेलून वयाची शंभरीपार केलेल्या वृध्दाला कोरोनातून बरे केले. कोरोनामुक्त झालेल्या रघुनाथ जाधव यांना कृष्णा हॉस्पिटलच्या स्टाफने टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज दिला. आजअखेर कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन बरे झालेल्या 4 हजार 965 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कृष्णा हॉस्पिटलने सुरूवातीपासून कोरोना रुग्णांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध केल्या होत्या. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांना बरे करण्यात आम्हाला यश आले. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत तरुणांची संख्या होती. आता तिसर्‍या लाटेत लहान मुलांची संख्या वाढू शकते, असा अंदाज आहे. परंतु, असे होईलच असे नाही. लसीकरणाचा वेग वाढला तर कोरोना संसर्गाला आपण रोखू शकतो. गर्दी टाळण्याबरोबरच मास्क, सॅनिटायझरचा वापर, सामाजिक अंतराचे पालन करणे आवश्यक असल्याचे डॉ. सुरेश भोसले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Last Updated : Jun 15, 2021, 4:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details