सातारा : कृषीमंत्री अब्दुल सत्तार ( Agriculture Minister Abdul Sattar ), मंत्री संजय राठोड ( Minister Sanjay Rathod ) यांच्यानंतर विधीमंडळ हिवाळी अधिवेशनात ठाकरे गटाने शिंदे गटातील आणखी एका मंत्र्याला लक्ष्य केले आहे. मंत्री शंभूराज देसाईंनी परवानगी न घेता महाबळेश्वर येथील इकोसेन्सेटिव्ह झोनमधील जमिनीवर घराचे अवैध बांधकाम ( Illegal construction in Mahabaleshwar ) केल्याचा आरोप ठाकरे गटाने ( Thackeray group accuse on minister Shambhuraj Desai ) केला आहे. यासंदर्भात मंत्री शंभूराज देसाईंनी खुलासा केला आहे.
मंत्री शंभूराज देसाईंचा खुलासा : मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत त्यांनी मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये कुठलेही तथ्य नाही म्हणून हा आरोप खोटा आहे. निवडणूकीच्या शपथपत्रात मी हे नमूद केले आहे. ग्रामपंचायतीतील हद्दीतील ती जमीन आहे. ग्रामपंचायतीचा उतारा माझ्याकडे आहे यासाठी मी त्या जागेची घरपट्टी देखील भरतो. या जमिनीच्या चौकशीला सामोरो जाण्याची माझी तयारी आहे. व मी चौकशीला पूर्णपणे सहकार्य करेल.
अनिल परबांवर टीकास्त्र : मंत्री शंभूराज देसाई यांनी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, मी समुद्रकिनारी घर बांधणारा नाही. न्यायालयाने आदेश देऊनही अनिल परब यांनी दुसऱ्यांवर आरोप करू नये. तसेच अनिल परब यांनी माझ्यावर केलेले आरोप मागे घेतले नाहीत तर मी पण त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेल असा इशारा मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आहे.