महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कराडजवळ तिहेरी अपघातात टेम्पो चालक जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी - कराडजवळ तिहेरी अपघात

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गोटे गावच्या हद्दीत ट्रॅक्टरला पाठीमागून येणार्‍या आयशर ट्रकने धडक दिली. या अपघातानंतर ट्रॅक्टर चालक भाऊसाहेब येडे आणि आयशर टेम्पो चालक बाबूराव माने या दोघांमध्ये वाद सुरू असताना पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने ट्रॅक्टरला आणि टेम्पो चालक माने, सयाजी जमाले, भावसाहेब येडे यांना धडक दिली. त्यात टेम्पो चालक बाबूराव माने यांचा जागीच मृत्यू झाला, तर सयाजी जमाले आणि भाऊसाहेब येडे हे दोघे या अपघातात गंभीर जखमी झाले.

satara
कराडजवळ तिहेरी अपघातात टेम्पो चालक जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी

By

Published : Jan 19, 2020, 5:52 PM IST

सातारा -पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गोटे (ता. कराड) गावच्या हद्दीत शनिवारी पहाटे ट्रॅक्टर, आयशर टेम्पो आणि ट्रक यांचा तिहेरी अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात टेम्पो चालक ठार झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. बाबूराव बिरू माने (रा. पेड, ता. तासगाव, जि. सांगली) असे अपघातात ठार झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. तर सयाजी रामचंद्र जमाले (वय 55, रा. मुंढे, ता. कराड), भाऊसाहेब रामदास येडे (वय 25 रा. बीड) हे गंभीर जखमी आहेत.

हेही वाचा -कराड जनता बँक दिवाळखोरीत; ठेवीदारांचा अध्यक्षांना घेराव

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गोटे गावच्या हद्दीत ट्रॅक्टरला पाठीमागून येणार्‍या आयशर ट्रकने धडक दिली. या अपघातानंतर ट्रॅक्टर चालक भाऊसाहेब येडे आणि आयशर टेम्पो चालक बाबूराव माने या दोघांमध्ये वाद सुरू असताना पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने ट्रॅक्टरला आणि टेम्पो चालक माने, सयाजी जमाले, भावसाहेब येडे यांना धडक दिली. त्यात टेम्पो चालक बाबूराव माने यांचा जागीच मृत्यू झाला, तर सयाजी जमाले आणि भाऊसाहेब येडे हे दोघे या अपघातात गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला.

हेही वाचा -कराडच्या पोलीस अधिक्षकांचा दणका : 80 दुचाकींवर कारवाई; 35 हजाराचा दंड वसूल

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच कराड शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि महामार्ग मदत केंद्राचे कर्मचारी दस्तगीर आगा, अमित पवार, योगेश पवार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तत्काळ रूग्णालयात दाखल केले. अपघाताची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली असून वाहतूक शाखेचे पोलीस ट्रक चालकाचा शोध घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details