महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 21, 2021, 3:39 PM IST

ETV Bharat / state

चक्रीवादळातील बाधितांना लवकरच नुकसान भरपाई मिळेल - पृथ्वीराज चव्हाण

चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारने दिलेले आहेत. बाधितांना शासनाकडून लवकरच नुकसान भरपाई दिली जाईल, अशी ग्वाही आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

Prithviraj Chavan
Prithviraj Chavan

कराड (सातारा) -राज्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारने दिलेले आहेत. बाधितांना शासनाकडून लवकरच नुकसान भरपाई दिली जाईल, अशी ग्वाही आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. कोकणासह राज्यात इतर ठिकाणीही तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसला आहे. कराडजवळच्या चचेगावात केळी उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वार्‍याने केळीची बाग भुईसपाट केली आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून तातडीने शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आपण प्रशासनाला दिल्या असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना वादळाचा मोठा फटका बसला असला तरी राज्यातील अन्य भागातही नुकसान झाले आहे. सातारा जिल्ह्यातसुद्धा अनेक भागात मोठी हानी झाली आहे. चचेगाव येथे सात एकरातील केळीची बाग उद्ध्वस्त झाली आहे. त्या ठिकाणी जाऊन आमदार चव्हाण यांनी पाहणी केली.

केळी बागेच्या नुकसानीचा तातडीने पंचनाम करण्याची सूचना यावेळी चव्हाण यांनी प्रशासनाला केली. लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासन स्तरावर आपण पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी बाधित शेतकर्‍यांना दिली. यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका कृषी अधिकारी मुल्ला, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटील, सातारा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र चव्हाण, चचेगावचे ग्रामपंचायत सदस्य राहुल पवार, अभिजीत चव्हाण, राहुल काळुखे, केळी उत्पादक शेतकरी हणमंत हुलवान, साहेबराव पवार, विलास पवार, संदीप पवार उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details