तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांची भावनिक हाक; पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केले आवाहन - पूरग्रस्तांना मदत
तमाशाच्या माध्यमातून प्रबोधन करणाऱ्या बनसोडे कुटूंबाने नैसर्गिक आपत्ती आल्यावर सावरण्यासाठी प्रत्येक वेळी योगदान दिले आहे. आताही हे कुटूंब पूरग्रस्ताच्या पाठीशी उभे राहिले आहे. त्यांनी आपल्या करवडी (ता. कराड) या गावातून पूरग्रस्तांना मदत पाठवली आहे.
तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांची भावनिक हाक; पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केले आवाहन
सातारा -राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त सुप्रसिद्ध तमाशा कलावंत मंगला बनसोडे आणि त्याचे सुपुत्र नितीन कुमार बनसोडे हे पूरग्रस्तांच्या मदतीला धावले आहेत. त्यांनी आपल्या करवडी (ता. कराड) या गावातून पूरग्रस्तांना मदत पाठवली आहे.