सातारा -येथे उताऱ्यावर वारस नोंद करून तसा सातबारा उतारा देण्यासाठी १हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. निवास दिनकर पाटील (वय. 54) असे तलाठ्याचे नाव असून ते विहे (ता. पाटण) येथे कार्यरत आहे. सायंकाळी उशिरा त्यांच्यावर पाटण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
लाच स्वीकारताना साताऱ्यातील तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात - Satara Police News
सातारा येथे उताऱ्यावर वारस नोंद करून तसा सातबार उतारा देण्यासाठी १ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना तलाठ्याला लाचलुचपत विभागाणे अटक केली. याप्रकरणी पाटण पोलीस ठाण्यात तलाठ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूळचे वारूंजी, (ता. कराड) येथील निवास दिनकर पाटील हे विहे, (ता. पाटण) सजाचे तलाठी होते. त्यांच्याकडेच मल्हारपेठ सजाचा अतिरक्त कार्यभार आहे. निवास पाटील यांनी तक्रारदार (वय 28) यांच्या चुलत्यांच्या सातबारा उताऱ्यावर वारस नोंद करून तसा सातबारा उतारा देण्यासाठी तक्रारदाराकडून 1 हजार 500 रुपयांची लाच मागितली होती. शनिवार दि. 4ला तक्रारदाराकडून 1 हजार 500 रुपयांची लाच स्वीकारताना ते सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अलगद सापडले. त्यानंतर निवास पाटील यांच्यावर पाटण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुण्याचे पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधिक्षक सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारचे पोलीस उपअधिक्षक अशोक शिर्के, विनोद राजे, संभाजी काटकर, निलेश येवले, निलेश वायदंडे यांनी सापळा रचून ही कारवाई केली. या कारवाईमुळे पाटण तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.