महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे या मूळगावी! मुख्यमंत्री गावात, गावकरी जोमात! - शेतीची पाहणी

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ग्रामदैवत उत्तरेश्वराच्या यात्रेसाठी महाबळेश्वर तालुक्यातील दरे बुद्रुक या मूळ गावी दाखल झाले आहेत. गावात आल्यानंतर त्यांनी शेतीची पाहणी केली. पुढील २ दिवस ते गावी मुक्कामी गावच्या (Entered in native village Dare) यात्रेत देखील सहभागी झाले आहेत.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By

Published : Jan 7, 2023, 9:50 AM IST

सातारा: राज्याच्या राजकारणातून ब्रेक घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे ग्रामदैवत उत्तरेश्वराच्या यात्रेसाठी दरे या मूळ गावी दाखल झाले आहेत. गावात आल्यानंतर त्यांनी शेतीची पाहणी (agriculture Inspection ) केली. पुढील २ दिवस ते गावी मुक्कामी असणार आहेत. (Entered in native village Dare) इथे त्याना छान वाटतं आहे. मोबाईलला रेंज नाही, गोंगाट, प्रदूषण नाही. शांततेचा अनुभव घ्यायला मिळतो, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री शेतात रमले:चार महिन्यांपूर्वी गावी येऊन लागवड केलेल्या स्ट्रॉबेरीला आता लाल चुटूक फळे आली आहेत. त्या स्ट्रॉबेरीची त्यांनी चव चाखली. महाराष्ट्रात घेतली जात नाहीत अशा लवंग, वेलची, दालचिनी, कॉफी, पेरू, आंबा, फणस, चिक्कू, सफरचंद, स्ट्रॉबेरी, मिरची, हळद या सह लाल चंदन, गवती चहाची शेती फुलवली आहे.

आधीपासूनच गावाची ओढ:आपण शेतात स्वत: काम केले तरच दुसऱ्याला सांगू शकतो. शेतीत नवे तंत्रज्ञान वापरायला हवे. मला गावाची ओढ आधीपासून आहे. मी वर्षातून एक-दोन वेळा तरी गावाला भेट देतो. इथे आल्यावर छान वाटतं. निसर्गरम्य वातावरण, वाहने नाहीत, गोंगाट नाही, मोबाईलला रेंज नाही, प्रदूषण नाही. शांततेचा अनुभव घ्यायला मिळतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

दहा गावांची यात्रा:ग्रामदैवत उत्तरेश्वराच्या यात्रेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे या मूळगावी दाखल झाले असून पुढील २ दिवस ते गावी मुक्कामी असणार आहेत. या भागातील १० गावांची ही मोठी यात्रा आहे. शुक्रवारी रात्री यात्रेला सुरुवात झाली असून रात्री उशिरापर्यंत ही यात्रा चालणार असल्याची माहितीही एकनाथ शिंदे यांनी दिली.

आश्वासनांची खैरात: महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार, क्रीडा मंत्री गिरीश महाजन, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत पार पडले. म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन सभागृहात महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेचा औपचारिक उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित खेळाडूंना सरकार खेळाडूंबरोबर असल्याचा विश्वास देताना आश्वासनांची खैरात केली. इंटरनेटच्या युगात खेळाडूंनी मैदानावर उतरायला हवे. मैदानावरील उपस्थिती हा तंदुरुस्त- आरोग्याचा मंत्र असतो. मैदानावर दिवसातला एक तास घालवला तरी आव्हानाचा सामना करण्याची जबरदस्त ऊर्जा तयार होते, असेही शिंदे यांनी सांगितले आहे.

राज्यात नव्याने १२२ क्रीडा संकुले:महाराष्ट्रातील खेळाडू गुणवान आहेत. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने यापूर्वीच रोख पारितोषिकात पाचपट वाढ केली आहे. सरकार खेळाडूंबरोबर कायम असेल, असा विश्वास खेळाडूंना देताना शिंदे यांनी राज्यात नव्याने १२२ क्रीडा संकुले सुरू करण्यात येतील. राज्यातील खेळाडूंना चांगले प्रशिक्षित करण्यासाठी त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांची नियुक्तीही करण्यात येईल, राज्यातून ऑलिम्पिक पदकविजेता खेळाडू घडण्यासाठी महाराष्ट्र सरकार कुठेही कमी पडणार नाही, असे आश्वासनेही शिंदे यांनी या वेळी दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details