कराड (सातारा) - श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अतुल भोसले हे कराडकरांशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधत आहेत. कोरोनाशी सामना करताना स्वत:बरोबरच शहरवासियांचीही काळजी घ्या. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, असे आवाहन ते कराडकरांना करत आहेत.
स्वत:बरोबरच नागरिकांचीही काळजी घ्या; डॉ. अतुल भोसलेंचे कराडकरांना आवाहन - karad corona news
लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद आहेत. हातावर पोट असणाऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालाय. यामुळे कामगारांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. त्याची माहितीही डॉ. अतुल भोसले घेत आहेत.
लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद आहेत. हातावर पोट असणाऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालाय. यामुळे कामगारांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. त्याची माहितीही डॉ. अतुल भोसले घेत आहेत. व्हिडिओ कॉलद्वारे थेट तरुण आणि सर्व क्षेत्रातील नागरिकांचे प्रश्न ते जाणून घेत आहेत.
संचार आणि जमावबंदी ही लोकांच्या सुरक्षिततेसाठीच आहे. संसर्ग रोखण्यासाठी लोकांनी प्रशासनाच्या सूचना आणि आदेशाचे पालन करण्याचे आवाहनही ते करत आहेत. कृष्णा रुग्णालयाच्या माध्यमातून कोरोना बाधितांवरील उपचारासाठी केलेल्या सुविधांचे कौतुक करून कराडकर डॉ. अतुल भोसले यांना धन्यवाद देत आहेत.