महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Udayanraje Letter : राज्यपालांसह त्रिवेदींवर कारवाई करा, खासदार उदयनराजेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्ये करुन ( Bhagatsingh Koshyari controversy ) सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे. ही बाब अतिशय गंभीर आणि दुर्देवी आहे.

उदयनराजे पत्र
उदयनराजे पत्र

By

Published : Nov 24, 2022, 7:19 AM IST

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ( MP Udayanraje letter to PM ) पत्र लिहिले आहे. शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांवर ठोस कारवाई करण्याची मागणी ( Udayanraje letter to Sudhanshu Trivedi ) त्यांनी केली आहे. गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनादेखील उदयनराजे यांनी ( governors resignation demand in Maharashtra ) पत्र पाठवले आहे.



जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्ये :छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्ये करुन ( Bhagatsingh Koshyari controversy ) सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे. ही बाब अतिशय गंभीर आणि दुर्देवी आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांची वक्तव्ये निषेधार्ह आहेत. मी त्यांचा तीव्र शब्दांत निषेध करतो, असे उदयनराजेंनी मोदींना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.


समर्थ रामदासांबद्दलही चुकीचा संदर्भसमर्थ रामदास गुरु होते म्हणून शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करता आले, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते, अशी तक्रार उदयनराजे यांनी पत्रात केली आहे. तसेच महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलही राज्यपालांनी जाहीर कार्यक्रमात अपमानास्पद वक्तव्य केले होते. अडीच वर्षे महाराष्ट्राच्या राज्यपालपदी असतानाही त्यांना शिवराय समजले नाहीत. ही बाब अत्यंत दुर्देवी आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद असताना दिवसेंदिवस ते आपल्या पदाची प्रतिष्ठा रसातळाला नेत असल्याचे उदयनराजेंनी पत्रात आहे.

राज्यपालांना हटविण्याची राज्यभरातून मागणीऔरंगबाद येथे झालेल्या विद्यापीठाच्या दीक्षांत कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या युगाचे आदर्श आहेत, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले होते. त्यावरून राज्यभरात राज्पालांचा निषेध करण्यात आला. राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या ठाकरे गटाने राज्यपालांना पदावरून हटवावे, अशी मागणी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details