महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

50 हजारांची लाच घेताना तहसील कार्यालयातील लिपिक एसीबीच्या जाळ्यात

50 हजारांची ऑनलाईन लाच घेणाऱ्या सातारा तहसील कार्यालयातील लिपिक रमाकांत फडतरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.

tahasil-clerk-raid-hand-arrest-by-acb
लिपिक एसीबीच्या जाळ्यात

By

Published : Feb 25, 2020, 11:05 PM IST

सातारा - पुनर्वसनाचे रखडलेले काम करण्यासाठी 50 हजारांची ऑनलाईन लाच घेणाऱ्या सातारा तहसील कार्यालयातील लिपिक रमाकांत फडतरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी,की सातारा तालुक्‍यातील तक्रारदार याचे जमीन पुनर्वसनाचे काम सातारा तहसील कार्यालयात प्रलंबित होते. ते काम करण्यासाठी लिपिक फडतरे याने 50 हजाराची लाच मागितल्याची सातारा एसीबीला तक्रारदाराने माहिती दिली होती. त्यानंतर एसीबीने तहसील कार्यालयाच्या आवारात मंगळवारी सायंकाळी सापळा लावून लाच मागणीची पडताळणी केली.

यावेळी फडतरे लाच मागत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर फडतरे याने लाचेची रक्कम त्याच्या बँक खात्यात भरण्यास तक्रारदाराला सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने फडतरेच्या बँक खात्यात लाचेची रक्‍कम म्हणून 50 हजार रुपये भरल्यानंतर एसीबीने त्याला ताब्यात घेतले. फडतरे याच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details