सातारा -महाबळेश्वरपासून काही अंतरावर असणाऱ्या कारवी अळी परिसरात पालिकेच्या कचरा डेपो जवळील जंगलामध्ये तीन आणि कारवी अळी गावामध्ये तीन जनावरे अशी एकूण सहा जनावरांचा विषबाधेने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. महाबळेश्वर शहरापासून अंदाजे पाच किमी अंतरावर तापोळा रस्त्यावर कारवी अळी हे गाव असून त्याच्याबाजूलाच महाबळेश्वर पालिकेचा कचरा डेपो आहे.
महाबळेश्वरमध्ये सहा जनावरांचा संशयास्पद मृत्यू - animal died satara
महाबळेश्वरपासून काही अंतरावर असणाऱ्या कारवी अळी परिसरात पालिकेच्या कचरा डेपो जवळील जंगलामध्ये तीन आणि कारवी अळी गावामध्ये तीन जनावरे अशी एकूण सहा जनावरांचा विषबाधेने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

हेही वाचा -ठेकेदारांच्या बिलांवरून कराडच्या मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची धुळवड
कारवी अळी आणि त्याच्या बाजूलाच असलेल्या कचरा डेपो परिसरात विस्तीर्ण जंगल असल्याने मृत जनावरांचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कारवी अळी गावातील जनावरे जंगल परिसरातून चरण्यासाठी येतात. जनावरे या कचरा डेपोतील कचरा आणि प्लास्टिक पदार्थ खातात. या प्लास्टिक आणि इतर पदार्थांमुळे जनावरांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याबाबतचे पत्र देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मृत जनावरांचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जयसिंग सिसोदिया यांनी केले असून विषाचा कोणता प्रकार आहे. हे पाहण्यासाठी तपासणीसाठी पाठवून दिले आहे.