नवी दिल्ली -प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफजलखान कबरीच्या परिसरात झालेल्या अतिक्रमाणावर अखेर सातारा जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. अफजलखान वध दिनी बुलडोझर फिरवत सर्व अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात ( Afzal Khan Grave )आली होती. यानंतर याचिकाकर्त्याने न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायलयाने या प्रकरणावर सुनावणी केली आहे. अफझलखानच्या थडग्याच्या आणि आजूबाजूच्या वास्तू पाडल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सातारा जिल्हाधिकारी, उप वनसंरक्षक यांच्याकडून अहवाल मागवला आहे.
Afzal Khan Grave : अफझलखानच्या थडग्याच्या आजूबाजूच्या वास्तू पाडल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मागवला जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल - Supreme Court sought report
अफझलखानच्या थडग्याच्या आणि आजूबाजूच्या वास्तू पाडल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सातारा जिल्हाधिकारी, उप वनसंरक्षक यांच्याकडून अहवाल मागवला आहे. प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफजलखान कबरीच्या परिसरात झालेल्या अतिक्रमाणावर सातारा जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने अहवाल मागविला आहे.
अशी झाली कारवाई - प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफजलखान कबरीच्या परिसरात झालेल्या अतिक्रमाणावर अखेल सातारा जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. अफजलखान वध दिनी बुलडोझर फिरवत सर्व अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. अत्यंत गोपनीयता बाळगत प्रशासनाने आज पहाटे ही कारवाई केली आहे. (Encroachment near Afzal Khan grave) सध्या प्रतापगड परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहे. तसेच, कबर परिसराकडे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे प्रतापगड परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. कबरीच्या परिसरातील अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी प्रशासनाने काल (दि. 9 नोव्हेंबर)रोजी बुधवारी रात्रीपासूनचं मोठी तयारी केली होती.
कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिसांची खबरदारी - पोलिस प्रशासनाकडून चार जिल्ह्यातील 1600 पोलिसांचा बंदोबस्त मागवण्यात आला होता. हे पोलीस रात्रीचं प्रतापगड परिसरात दाखल झाले होते. तसेच, अवजड यंत्रसामग्री प्रतापगडाकडे जात होती. महाबळेश्वरच्या बाजारपेठेत देखील पोलिसांची गस्त सुरू होती. त्यामुळे प्रशासनाकडून कसल्या तरी हालचाली सुरू असल्याची चाहूल स्थानिकांना लागली होती. मात्र, अत्यंत गोपनीयता बाळगत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पहाटे प्रशासनाने कबरीच्या परिसरातील अतिक्रमणे भुईसपाट केली आहेत.