सातारा -रामजन्मभूमी अयोध्या प्रकरणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर 'सातारा शहराला सामाजिक ऐक्याची परंपरा आहे. निकालानंतर कोणत्याही व्यक्तीने, समाजाने तसेच सोशल मिडीयावर व्यक्त न होता,शहराची शांतता अबाधीत ठेवावी, असे आव्हान पोलीस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते यांनी केले आहे.
जातीय व धार्मिक सलोख्याची परंपरा अबाधित ठेवूयात - पोलीस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते - सर्वांनी शांतता राखावी तेजस्वीनी सातपुते यांची प्रतिक्रीया
अयोध्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर अफवांवर विश्वास ठेवू नये.. सातारकरांनी सामाजिक ऐक्याची परंपरा जपल्याचा इतिहास आहे, हीच पंरपरा यापुढेही जपावी..
![जातीय व धार्मिक सलोख्याची परंपरा अबाधित ठेवूयात - पोलीस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5008563-thumbnail-3x2-aa.jpg)
हेही वाचा... मुंबईत ४०,००० पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, सोशल मीडियावर करडी नजर
फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटरसारख्या सोशल मिडीयावर अयोध्या निकालासंबंधी पोस्ट करु नये. अशाप्रकारे कोणतेही कृत्य झाल्यास त्यातून कायदा व सुव्यवस्था धोक्यात येवू शकते. अयोध्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर अफवांवर विश्वास ठेवू नये. या कालावधीमध्ये कोणतीही माहिती मिळाल्यास ती सोशल मिडीयावर व्हायरल न करता तत्काळ शहर पोलिसांना तसेच कंट्रोल रुमला कळवावे. सातारकरांनी सामाजिक ऐक्याची परंपरा जपल्याचा इतिहास आहे. हीच पंरपरा यापुढेही जपावी व सातारकरांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते यांनी केले आहे.
TAGGED:
Everyone should keep peace