सातारा - वडूज पोलिसांनी अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यात ताब्यात घेतलेला अल्पवयीन संशयिताने बालसुधारगृहामध्ये आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. मृताच्या नातेवाइकांनी बालसुधारगृहाबाहेर जमण्यास सुरूवात केल्यानंतर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
साताऱ्यातील बालसुधारगृहात अल्पवयीन मुलाची आत्महत्या - साताऱ्यात अल्पवयीन संशयित मुलांची सुधारगृहात आत्महत्या
युवतीवर अत्याचार केल्याचा गुन्हा वडूज पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर अल्पवयीन असल्याने त्याला साताऱ्यातील बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. बालसुधारगृहातच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
बालसुधारगृह
खटाव तालुक्यातील एका गावात राहणार्या अल्पवयीन तरूणाने नात्यातल्या युवतीवर अत्याचार केल्याचा गुन्हा वडूज पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर अल्पवयीन असल्याने त्याला साताऱ्यातील बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. बालसुधारगृहातच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित युवकाच्या नातेवाइकांनी बालसुधारगृहाबाहेर मोठी गर्दी केली होती.
हेही वाचा -रस्ता नसल्याने खाटेवरून नेला मृतदेह; सिल्लोड तालुक्यात घटना
Last Updated : Aug 29, 2021, 2:24 AM IST