महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोणंद-फलटण रेल्वेमार्गावर रेल्वेची यशस्वी चाचणी, रेल्वेमार्गामुळे मिळणार विकासाला चालना - on lonand-faltan railway track

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील लोणंद-फलटण रेल्वेमार्गावर आज रेल्वेची यशस्वी चाचणी घेतल्याने येत्या काही दिवसांत या मार्गावर रेल्वे धावणार आहे. या रेल्वेमार्गामुळे फलटण तालुक्यातील शेती, औद्योगिकीकरण, व्यापारीकरण तसेच दळणवळणाला चालना मिळणार आहे.

लोणंद-फलटण रेल्वेमार्गावर रेल्वेची यशस्वी चाचणी

By

Published : Aug 20, 2019, 9:31 PM IST

सातारा - जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील लोणंद-फलटण रेल्वेमार्गावर आज (मंगळवारी) रेल्वेची यशस्वी चाचणी घेतल्याने येत्या काही दिवसांत या मार्गावर रेल्वे धावणार आहे. या रेल्वेमार्गामुळे फलटण तालुक्यातील शेती, औद्योगिकीकरण, व्यापारीकरण तसेच दळणवळणाला चालना मिळणार आहे.

लोणंद-फलटण रेल्वेमार्गावर रेल्वेची यशस्वी चाचणी, रेल्वेमार्गामुळे मिळणार विकासाला चालना

यासंदर्भात खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी गेल्या आठवड्यात केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची दिल्ली येथे भेट घेतली होती. या भेटीमध्ये त्यांनी लोणंद-फलटण लोहमार्ग लवकरात लवकर सुरु करण्याची विनंती केली होती. यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री गोयल यांनीही लोणंद-फलटण लोहमार्ग 40 दिवसांत सुरू करू, अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर आज दुपारी लोणंद-फलटण रेल्वेमार्गावर प्रत्यक्षात रेल्वे धावली.

आजची चाचणी झाल्यानंतर अजून दोन चाचण्या घेऊन प्रत्यक्ष रेल्वे सुरू करणार असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे. या क्षणाचे अनेक फलटणकर साक्षीदार झाले. तसेच फलटण तालुक्याचा हा जिव्हाळ्याचा प्रलंबित प्रश्‍न सुटल्याने अनेकांनी या रेल्वेच्या शेजारी उभे राहुन फोटो व सेल्फी काढले.

ABOUT THE AUTHOR

...view details