महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मार्च अखेरपर्यंत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान? विकास सोसायट्यांचा वसुलीसाठी टाहो

सरकारने पहिल्या टप्प्यात थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्ज माफी दिली आहे. त्यानंतर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वित्तमंत्री अजित पवार यांनी वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्यांना 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर केले. त्यामुळे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Satara
शेतकरी

By

Published : Mar 11, 2020, 11:03 AM IST

Updated : Mar 11, 2020, 11:17 AM IST

सातारा - अर्थसंकल्पीय अधिवेशनात नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्यांना 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान शासनाने जाहीर केले आहे. परंतु, या बाबतचे कोणत्याही प्रकारचे निकष सांगितले नाहीत. त्यामुळे मार्चपर्यंत कर्ज फेडणाऱ्यांना खरच अनुदान मिळणार आहे की? ही अफवा आहे? असे प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केले आहेत.

मार्च अखेरपर्यंत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान?

तर दुसरीकडे सोसायट्यांनी 2019 मधील पीक कर्जाची वसुली सुरू केली आहे. पण, नियमित शेतकरी पीक कर्ज भरण्याच्या मानसिकतेत नाही. मात्र, मार्च अखेरपर्यंत कर्ज परतफेड न केल्यास संबंधित शेतकरी थकबाकीदार होऊन शासनाचे प्रोत्साहन मिळण्यात अडचण होण्याची शक्यता आहे, असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परंतु, या बाबतीत कोणत्याही प्रकारचा निर्णय झाला नसल्याचे सहाय्यक निबंधक कार्यलायाकडून सांगितले जात आहे.

सरकारने पहिल्या टप्प्यात थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्ज माफी दिली आहे. त्यानंतर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वित्तमंत्री अजित पवार यांनी वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्यांना 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर केले. त्यामुळे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. प्रोत्साहन अनुदान देताना सरकार 31 मार्चपर्यंत कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास 31 मार्चच्या आत कर्ज परतफेड करणारेच त्यास पात्र ठरतील. उर्वरित शेतकरी मात्र हे अनुदान मिळण्यास अपात्र ठरण्याची शक्यता आहे.

सध्या तरी वेळेत कर्ज भरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. त्यामध्ये 50 हजारांपर्यंतचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. कोणत्याही शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर हे अनुदान जमा होणार नाही. त्यामुळे पीक कर्ज न भरण्याच्या मानसिकतेत असलेले शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्णय झाला नसला तरी देखील पीक कर्ज ज्या त्या वेळात भरावे, असे देखील सहाय्यक निबंधक कार्यलाय मार्फत सांगितले जात आहे.

Last Updated : Mar 11, 2020, 11:17 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details