महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Minister Uday Samant on Exam : ऑफलाईन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी सज्ज राहावे - उदय सामंत

उद्यापासून (1 फेब्रुवारी) राज्यातील महाविद्यालये (Colleges Reopen) आपण प्रत्यक्ष सुरू करत आहोत, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी कराड (Karad) येथे दिली. 15 फेब्रुवारीपर्यंतच्या परीक्षा ऑनलाईनच होणार आहेत. परंतु, त्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेसाठी सज्ज राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

minister uday samant
मंत्री उदय सामंत

By

Published : Jan 31, 2022, 6:46 PM IST

Updated : Jan 31, 2022, 6:56 PM IST

कराड (सातारा) - कोरोनाच्या संकटामुळे ऑनलाईन शिक्षण व ऑनलाईन परीक्षेचा निर्णय (Online Education Exam) घ्यावा लागला. उद्यापासून (मंगळवार) राज्यातील महाविद्यालये आपण प्रत्यक्ष सुरू (Colleges Reopen) करत आहोत, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant in Karad) यांनी कराड येथे पत्रकारांशी बोलताना दिली. 15 फेब्रुवारीपर्यंतच्या परीक्षा ऑनलाईनच होणार आहेत. परंतु, त्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेसाठी सज्ज राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी आज राज्यभरात विद्यार्थ्यांनी आंदोलनं केले आहेत.

प्रतिक्रिया देताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
  • स्थानिक परिस्थितीनुसार जिल्हाधिकारी निर्णय घेऊ शकतात -

शैक्षणिक गुणवत्ता टिकवण्यासाठी ऑफलाईन शिक्षण गरजेचे आहे. पण, कोरोनाच्या संकटामुळे ऑनलाईन शिक्षणाचा नाईलाजाने आधार घ्यावा लागला. आता 1 फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालये पुर्ववत सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तरीदेखील जिल्ह्यातील स्थानिक परिस्थितीनुसार जिल्हाधिकारी काही निर्णय घेऊ शकतात, असे उदय सामंत म्हणाले.

  • दोन डोस घेतलेल्यांनाच विद्यालयांमध्ये प्रवेश -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. मात्र, त्यामुळे विद्यार्थी वर्गाबाहेर राहू नयेत म्हणून लसीकरण शिबीरे महाविद्यालयात आयोजित केली जाणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच प्राचार्यांना खर्च करण्यावर मर्यादा होत्या. त्या खर्चाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय राज्यभरासाठी असल्याचे ते म्हणाले.

  • 'त्यांनी' वाईन विक्रीसंदर्भातील नियम, अटींचा अभ्यास करावा -

किराणा दुकान व मॉलमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय सरकारने घेतला. विरोधक त्यावर गदारोळ करत आहेत. परंतु, गदारोळ करणाऱ्यांनी त्याबाबतच्या नियम व अटींचा अभ्यास करण्याची गरज आहे, असा टोला उदय सामंत यांनी मारला.

  • तक्रार आल्यास कारवाई करणार -

तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये बोगस पदव्या दिल्या जात असल्याचे मत काही शिक्षण तज्ज्ञ व्यक्त करत असल्याकडे लक्ष वेधले असता सामंत म्हणाले, या संदर्भात पुराव्यासह लेखी तक्रार आल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल.

  • विधीज्ञांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेणार -

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडी दीड वर्षापासून रखडल्या आहेत. हा सुद्धा अन्यायाचा भाग आहे. त्यामुळे विधीज्ञांचा सल्ला घेऊन न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेणार आहे. हा माझा वैयक्तिक पुढाकार आहे. यामध्ये सरकार किंवा शिवसेनेचा कोणताही संबंध नाही, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

Last Updated : Jan 31, 2022, 6:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details