सातारा- सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात भाजपचे आमदार राम कदम यांनी ठाकरे सरकार बिहार पोलिसांच्या चौकशीला का घाबरते आहे..?, असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर आम्ही कोणत्याही चौकशीला घाबरत नाही. उलट भाजपचे आमदार ज्या पोलिसांच्या बंदोबस्तात सुरक्षित आहेत, त्याच पोलिसांवर ते अविश्वास दाखवत आहेत, अशी टिका गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.
भाजपचे आमदार ज्या मुंबई पोलिसांच्या बंदोबस्तात सुरक्षित, त्यांच्यावरच अविश्वास - गृहराज्यमंत्री देसाई - मुंबई पोलीस बातमी
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलीस पारदर्शपणे करत आहेत. त्यामुळे भाजप ज्या मुंबई पोलिसांमुळे भाजप नेते सुरक्षित आहेत, त्या पोलिसांवरच अविश्वास दाखवत असल्याची टिका राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आमदार राम कदम यांच्यावर केली आहे.
shabhuraj desai
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सिनेसृष्टीतील अनेक निर्माते, दिग्दर्शक, त्याचे निकटवर्तीयांची चौकशी पोलिसांकडून करण्यात आली आहे. मात्र, भाजपचे आमदार आपल्याच पोलिसांनी अविश्वास दाखवत बिहार पोलिसांवर विश्वस ठेवत आहेत ही चुकीची गोष्ट आहे. महाराष्ट्र पोलीस या प्रकरणाचा पारदर्शकपणे तपास करत असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले.
Last Updated : Aug 4, 2020, 4:39 PM IST