सातारा- नागरिकत्व संशोधन दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे भारत बंदची बुधवारी हाक देण्यात आली होती. या बंदला कराडमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. व्यावसायिकांनी सायंकाळपर्यंत कडकडीत बंद पाळला.
'भारत बंद'ला कराडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद - satara news
नागरिकत्व संशोधन दुरुस्ती कायद्याला विरोध करत भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. यात बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांसह मुस्लीम समाजाने सहभाग नोंदवत शांततेत बंद पाळला.
spontaneous-response-of-bharat-band-in-karad-satara
हेही वाचा-हळदी समारंभात नाचताना 25 वर्षीय तरूणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
बंदच्या पार्श्वभूमीवर बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी कराड शहरातून रॅली काढून बंदमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केले. बहुजन क्रांती मोर्चा आणि मुस्लीम समाजाचा मोर्चामध्ये सहभाग होता. बंदच्या पार्श्वभूमीवर कराड पोलिसांनी शहारात सगळीकडे कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. हा बंद शांततेत पार पडला.