सातारा- छत्रपती घराण्याचे आराध्य दैवत शिखर शिंगणापुरातील महादेव मंदिर . . कोरानाचा संसर्ग होऊ नये, यासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर राजमाता छत्रपती कल्पनाराजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रशासनाला सहकार्य करत लाखो भाविकांचे शिखर शिंगणापूर हे त्यांच्या खासगी मालकीचे मंदिर 25 मार्चपासून बंद केले आहे. या ठिकाणी फक्त पूजा नित्यनियमितपणे सुरू आहे. या मंदिराची अख्यायिका खास ईटीव्ही भारतच्या वाचकांसाठी.
छत्रपती घराण्याचे दैवत शिखर शिंगणापूर मंदिराचा इतिहास, पाहा ईटीव्ही भारतवर - राजमाता छत्रपती कल्पनाराजे भोसले
कोरानाचा संसर्ग होऊ नये, यासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर राजमाता छत्रपती कल्पनाराजे भोसले व श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रशासनाला सहकार्य करत लाखो भाविकांचे शिखर शिंगणापूर मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
शिखर शिंगणापूर मंदिर
शिखर शिंगणापूर हे अखंड महाराष्ट्रचे आराध्य दैवत आहे. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मात्र यावर्षी फक्त 3 राजांना या ठिकाणी परवानगी देण्यात आली होती. यामध्ये काळवगाडे महाराज इंदूर, कोल्हापूर तसेच तेल्याबुहत्या बुवा महाराज यांना दिली होती. याबाबतचा आढावा पाहुयात ईटीव्ही भारतवर.