महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गुरुपौर्णिमा विशेष : 'कसोटीच्या प्रसंगात परिस्थितीवर मात करण्याचे भान देणारे गुरू' - तेजस्वी सातपुते - gurupournima occasion tejaswi satpute

कसोटीच्या प्रसंगात परिस्थितीवर मात करुन कसं पुढं जायचं याचे भान देणारे माझे आई-वडील, प्रोफेशनच्या स्तरावर माझे वरिष्ठ, मुलीसारखे प्रेम करणारे शिक्षक आणि काही मित्र-मैत्रिणी हे माझे गुरू राहिले. तुम्ही कोणत्याही पदावर असा, ज्याच्या पाठीशी असण्याने कधीही एकटे वाटत नाही, त्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अभिवादन करावेसे वाटते, अशा शब्दात जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आपल्या गुरुंबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

satara sp tejaswi satpute
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते

By

Published : Jul 5, 2020, 8:20 AM IST

Updated : Jul 5, 2020, 9:53 AM IST

सातारा - 5 जुलै हा दिवस सर्वत्र गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. गुरुविषयी आपली भावना व्यक्त करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्याचे काम केले जाते. या अनुषंगाने 'ईटीव्ही भारत'ने 'तस्मै श्री गुरुवे नम:' या मालिकेच्या माध्यमातून राज्यातील विविध सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी या सर्वांनी आपापल्या गुरुविषयी आपली भावना व्यक्त करत त्यांचे आभार मानले. तसेच त्यांच्या शिकवणी आणि आठवणींना उजाळा दिला.

गुरुपौर्णिमा विशेष : 'कसोटीच्या प्रसंगात परिस्थितीवर मात करण्याचे भान देणारे गुरू' - तेजस्वी सातपुते

सातारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते -

कसोटीच्या प्रसंगात परिस्थितीवर मात करुन कसे पुढे जायचे याचे भान देणारे माझे आई-वडील, प्रोफेशनच्या स्तरावर माझे वरिष्ठ, मुलीसारखे प्रेम करणारे शिक्षक आणि काही मित्र-मैत्रिणी हे माझे गुरू राहिले. तुम्ही कोणत्याही पदावर असा, ज्याच्या पाठीशी असण्याने कधीही एकटे वाटत नाही, त्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अभिवादन करावेसे वाटते, अशा शब्दात जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आपल्या गुरुंबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

वीरगती प्राप्त झालेले वरिष्ठ अधिकारी अशोक कामटे, निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी अधिकारी मीरा बोरवणकर, सुरेश खोपडे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष आणि आपल्या कामाच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी समाजमनावर आपली छाप पाडली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या काळात जिल्हा प्रशासनाच्या साथीने त्या काम करत आहेत.

त्या म्हणाल्या, आयुष्यात विविध टप्प्यांवर गुरू भेटत गेले. प्रथम आई-वडिलांच्या रुपात, कधी शिक्षक, कधी मित्र-मैत्रिणींच्या रुपात तर प्रशासकीय सेवेत वरिष्ठ अधिकाऱयांच्या रुपात गुरुंनी दर्शन दिले. ते त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात कार्यरत असले तरी त्यांचे पाठबळ आजही पुढे जाण्याची प्रेरणा देते, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

Last Updated : Jul 5, 2020, 9:53 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details