सातारा- जिल्ह्यातील तापमानामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे धोक्याची घंटा ओळखून जिल्हा शासकीय रुग्णालयाने यंदा पहिल्यांदाच उष्माघाताचा वॉर्ड सुरू केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यातील पारा गेल्या काही वर्षांमध्ये ३९ ते जास्तीत जास्त ४० अंशावर गेला होता. मात्र यावर्षी पारा हा ४१ ते ४३ अंशावर जाऊ लागला आहे. यामुळे सातारकर हैराण झाले आहेत. रस्त्यावरती चालता चालता चक्कर येणे, डोके दुखणे, भुरळ येणे यांसारखा त्रास नागरिकांना होत आहे.
जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उष्माघाताचा वॉर्ड सुरू; रुग्णांना दिलासा - उष्माघात
उष्माघातामुळे त्रस्त झालेल्या रुग्णांवर प्राथमिक उपचार नेमका काय करायचा, या संदर्भात सूचना दिल्या गेल्या आहेत.
नागरिकांच्या सोयीसाठी तात्काळ हालचाल करून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बैठक बोलवली होती. या बैठकीमध्ये यंदा पहिल्यांदाच जिल्हा रुग्णालयात उष्माघाताचा वॉर्ड सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी स्वतंत्र वॉर्ड तातडीने तयार केला आहे. उष्माघातामुळे त्रस्त झालेल्या रुग्णांवर प्राथमिक उपचार नेमका काय करायचा, या संदर्भात सूचना दिल्या गेल्या आहेत.
उष्माघाताने त्रस्त रुग्णांमध्ये युवकांपासून ते वृद्धांचा समावेश आहे. सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत सिव्हिलमध्ये उष्माघाताचे रुग्ण उपचारासाठी येत आहेत. रात्री-अपरात्री अनेक जण श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात येत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यासाठी नवीन वॉर्ड तयार केला आहे.