सातारा - फलटण तालुक्यातील तरडगाव येथे पारधी वस्तीवर चोरीच्या प्रकरणात अडकवत असल्याच्या कारणावरून दोघांचा खून झाला. रविवारी सायंकाळी गबऱ्या भोसले याने मारहाण करून आपली आई आशीबाई रमेश भोसले व मामा नमन्या हचल पवार यांना गंभीर जखमी करून त्यांचा खून केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
धक्कादायक.. मुलाकडून आई व मामाची भाल्याने भोसकून हत्या
फलटण तालुक्यातील तरडगाव येथे पारधी वस्तीवर चोरीच्या प्रकरणात अडकवत असल्याच्या कारणावरून दोघांचा खून झाला. या प्रकरणाची नोंद लोणंद पोलिस ठाण्यात झाली आहे.
भूरकरवाडी येथे रहात असलेल्या फिर्यादी छाया नमन्या पवार यांच्या घराजवळ नमन्या हचल पवार व त्याची बहीण आशीबाई रमेश भोसले हे गप्पा मारत बसले होते. त्यावेळी त्याठिकाणी गबऱ्या रमेश भोसले, अरुण झबझब्या पवार, संपूबाई गबऱ्या भोसले, चोच्या राज्या शिंदे, शबनम राज्या शिंदे असे चारचाकी गाडी घेऊन आले. त्यांनी चोरीचा आळ घेता या कारणावरून मारहाण केली. गबऱ्या रमेश भोसले याने त्याच्या हातातील लाकडी भाला आशीबाई भोसले हिच्या गळ्यावर व नमन्या हचल पवार याच्या पोटात भोकसून गंभीर जखमी करून त्यांचा खून केला.
याबाबतची माहिती मिळताच लोणंद पोलिस ठाण्याचे सह पोलीस निरीक्षक संतोष चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या मारहाणीत आशीबाई भोसले व नमन्या पवार गंभीर जखमी झाले होते. त्यांना प्रथम फलटण व नंतर सातारा येथे सिव्हिल रूग्णालयता उपचारासाठी नेले होते. मात्र, त्यांचा मुत्यू झाला. संशयित आरोपी गबऱ्या भोसले हाही जखमी झाला आहे. लोणंद पोलिसांची दोन पथके त्याचा शोध घेत आहे.