सातारा- आपले लग्न करत नसल्याच्या कारणाने मुलाने स्वतःच्या आईची हत्या केल्याची घटना खटाव तालुक्यातील मोराळे येथे घडली आहे. आरोपी किरण शहाजी शिंदे (वय २९) याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
लग्न होत नसल्याच्या कारणाने साताऱ्यात मुलाने केली आईची हत्या - सातारा येथे मुलाने केली आईची हत्या
आपले लग्न करत नसल्याच्या कारणाने मुलाने स्वतःच्या आईची हत्या केल्याची घटना खटाव तालुक्यातील मोराळे येथे घडली आहे. आरोपी किरण शहाजी शिंदे (वय २९) याला पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा -मुंबई : दहिसर येथे वाढदिवसाचा केक खाल्ल्याने 17 जणांना विषबाधा
याबद्दल अधिक माहिती अशी की, मायणी येथील मोराळे गावात रात्री दोनच्या सुमारास किरणने वडील लघुशंकेसाठी घरातून बाहेर जात असताना त्यांना पाठीवर लाथ मारून घराबाहेर ढकलले व आतून कडी लावली. त्यानंतर आई कांताबाई यांना 'तू माझं लग्न का करत नाहीस व मला काम का सांगतेस', या कारणावरून वाद करून घरातील कुऱ्हाडीने तिच्या डोक्यात घाव घालून ठार केले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.