सातारा :ऐन यात्रेदिवशी कराड तालुक्यात मुलाने वडिलांची हत्या केली आहे. हत्येच्या या घटनेमुळे कराड तालुक्यातील जखिणवाडी येथे मोठी खळबळ घडली आहे. शिवीगाळ करत असल्याच्या कारणावरून मुलांने वडिलांची हत्या केली. जखिणवाडी येथे ऐन यात्रेदिवशी ही धक्कादायक घटना घडल्यामुळे यात्रेला गालबोट लागले आहे. शिवाजी नारू पाटील असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा अर्जुन शिवाजी पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शिवीगाळ केल्याच्या रागातून हत्या :रंगपंचमीला कराड तालुक्यातील जखिणवाडीच्या ग्रामदैवताची यात्रा असते. यात्रेच्या आदल्या रात्री मुलाने वडिलांची हत्या केली. ही बाबनंतर उघडकीस आली. रात्री जेवताना वडिलांनी शिवीगाळ केल्याच्या रागातून मुलाने हे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेमुळे गावात चर्चा होत आहेत.
महिलांनी केला आरडाओरडा :मृत शिवाजी पाटील हे पत्नी, मुलगा तसेच मुलगी आणि दोन नातवंडासह जखिणवाडीत वास्तव्यास होते. रात्री जेवताना शिवाजी पाटील हे मुलगा अर्जुन यास शिव्या देत होते. वडील व्यवसायाने शेती करतात. त्यावेळी आई रंगुबाई त्यांना गप्प बसा म्हणाल्या. त्यांनाही शिवीगाळ केल्याने मुलाने रागात वडिलांचा खून केला. महिलांनी आरडाओरडा केल्यामुळे घरात वाद सुरू असल्याचे सर्वांना समजले.