महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाई तालुक्यातील जवान सोमनाथ तांगडे यांना सिक्कीममध्ये वीरमरण

ओझर्डे (ता. वाई) येथील जवान सोमनाथ अरविंद तांगडे (वय ३८) यांना सिक्कीम येथे कर्तव्य बजावताना वीरमरण आले आहे. त्यांच्या मृत्यूने ओझर्डे गावावर शोककळा पसरली आहे.

जवान सोमनाथ तांगडे
जवान सोमनाथ तांगडे

By

Published : Apr 16, 2021, 10:07 PM IST

सातारा -ओझर्डे (ता. वाई) येथील जवान सोमनाथ अरविंद तांगडे (वय ३८) यांना सिक्कीम येथे कर्तव्य बजावताना वीरमरण आले आहे. त्यांच्या मृत्यूने ओझर्डे गावावर शोककळा पसरली आहे.

हिमवर्षावामुळे झाले जखमी

जवान तांगडे हे सिग्नल डिपार्टमेंटमध्ये हवालदार या पदावर कार्यरत होते. सिक्कीममधील कॉलिंग पाँग येथून दहा किलोमीटर दुर एका बर्फाच्या टेकडीवर कर्तव्यावर असताना दि.८ एप्रिलच्या रात्री बर्फाचा पाऊस झाला. त्यातच त्यांचा तंबू देखील उडून गेला, तंबू नसल्यामुळे तांगडे व त्यांचे साथीदार बर्फाच्या पावसामुळे जखमी झाले होते, ते रात्रभर थंडीत कुडकुडत होते. त्यानंतर तांगडे यांना चक्कर आल्याने, उपचारासाठी कॉलिंग पाँग येथील मिल्ट्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली, तेव्हापासून ते कोमात होते अखेर त्यांचा मृत्यू झाला आहे.

ओझर्डे गावावर शोककळा

आज सकाळी सातच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव सिक्कीमवरून विमानाने पुण्यात येणार आहे. नंतर ते गावी आणले जाईल. दोनच महिन्यापूर्वी सोमनाथ तांगडे यांच्या वडिलांचे निधन झाले होते. जवान तांगडे यांची सेवा संपली होती, परंतु दोन वर्षे त्यांना वाढ मिळाल्याने ते सिक्कीम मध्ये कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. तांगडे यांच्या निधनाने ओझर्डे गावावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा -उद्या यांना दोन वेळचं जेवण लागलं, तरी केंद्राकडे मागतील, नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीक

ABOUT THE AUTHOR

...view details