महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Satara Soldier Suicide : सुटीवर आलेल्या जवानाची राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या - Soldier on Leave Committed Suicide

सातारा येथील जवानाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या ( Jawan From Vayazwadi Commited Suicide ) केल्याचा प्रकार येथे घडला आहे. सुटीवर आलेल्या व्याजवाडी ( ता. वाई ) येथील जवानाने साताऱ्यातील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा आहे.

Satara Soldier Committed Suicide
साताऱ्यातील जवानाची आत्महत्या

By

Published : Sep 25, 2022, 12:42 PM IST

सातारा : सुटीवर आलेल्या व्याजवाडी (ता. वाई) येथील ( Jawan From Vayazwadi Commited Suicide ) जवानाने साताऱ्यातील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. विजय सुदाम कुदळे (वय ३४, रा. अमरलक्ष्मी, प्रेरणा सोसायटी, सातारा) असे आत्महत्या ( Vijay Sudam Kudale Commited Suicide ) केलेल्या जवानाचे नाव आहे. सातारा गणेशोत्सवासाठी सुटीवर आलेल्या व्याजवाडी (ता. वाई) येथील जवानाने अचानक साताऱ्यातील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या ( Jawan Leave For Ganeshotsav Committed Suicide ) केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


साताऱ्यातील राहत्या घरात घेतला गळफास :विजय कुदळे हे आयटीबीपीमध्ये कार्यरत होते. गणेशोत्सव काळात ते सुटीवर आले होते. त्यांची सुटी संपत आली असताना साताऱ्यातील अमरलक्ष्मी प्रेरणा सोसायटीमधील राहत्या घरात छताच्या हुकाला ओढणीने गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली.

व्याजवाडी गावावर शोककळा :विजय कुदळे यांनी गळफास घेतल्याचा प्रकार त्यांचे साडू भानुदास वाघ यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी कुदळे यांना जिल्हा रुगणालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचे पार्थिव व्याजवाडी येथे नेण्यात आले. कुदळे यांच्या निधनामुळे गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details