कराड (सातारा) - कोरोनामुळे कराड तालुक्यात आतापर्यंत 608 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आजवर 21082 रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी मंगळवारपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची आणि मृत्यूची संख्या आटोक्यात येण्यास मदत होणार आहे.
कोरोना आकडेवारी
कराड तालुक्यात सोमवारी स्वॅब घेण्यात आलेल्या रूग्णांचा मंगळवारी अहवाल आला आहे. त्यामध्ये कराड शहर आणि तालुक्यात 302 जण कोरोनाबाधित आढळून आले आहे. तसेच 6 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कराड तालुक्यात 608 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सातारा जिल्ह्यातील आकडेवारी पाहता आतापर्यंत 7 लाख 11 हजार 736 जणांचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यामध्ये 1 लाख 53 हजार 506 लोक कोरोनाबाधित आढळले आहेत. उपचारानंतर बरे झालेल्या 1 लाख 3 हजार 920 जणांना घरी सोडण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात 3 हजार 489 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून, 19 हजार 78 एवढे रूग्ण उपचार घेत आहेत.
हेही वाचा -लॉकडाऊन इफेक्ट.. महाराष्ट्रातील व्यापार क्षेत्राचे तब्बल 70 हजार कोटींचे नुकसान