महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोयना धरणातील भिंतीच्या लिफ्टमध्ये अडकला साप; सर्पमित्रांनी दिले जीवदान - धरणाच्या लिफ्टमध्ये अडकलेल्या सापाला जीवदान

कोयना धरणाच्या भिंतीमधील लिफ्टमध्ये अडकलेल्या 7 फुटी सापाला सर्पमित्रांनी जीवदान दिले. रविवारी दुपारी कर्मचारी लिफ्टमधून ये-जा करत असताना या सापाचे दर्शन झाले. त्यानंतर सर्पमित्रांनी अडचणीचा सामना साप पकडला.

लिफ्टमध्ये अडकलेल्या सापाला सर्पमित्रांनी दिले जीवदान
लिफ्टमध्ये अडकलेल्या सापाला सर्पमित्रांनी दिले जीवदान

By

Published : Mar 15, 2021, 9:43 AM IST

कराड (सातारा) - कोयना धरणाच्या भिंतीमधील लिफ्टमध्ये अडकलेल्या 7 फुटी सापाला सर्पमित्रांनी जीवदान दिले. रविवारी दुपारी पाठबंधारे विभागाचे कर्मचारी लिफ्टमधून जात असताना लिफ्टमध्ये साप असल्याचे आढळून आले. त्यानंतर सर्पमित्रांनी अत्यंत शिताफिने या सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.


कोयना प्रकल्पातील कर्मचार्‍यांना धरणाच्या भिंतीमधून खाली-वर ये-जा करण्यासाठी लिफ्टची सोय आहे. या लिफ्टमध्ये सात फुटाचा साप अडकल्याचे कर्मचार्‍यांच्या निदर्शानास आले. त्यानंतर कोयनानगर (ता. पाटण) येथील सर्पमित्र निखिल मोहिते, विकास माने आणि विश्वजित जाधव यांना याबाबतची माहिती देण्यात आली, तो पर्यंत लिफ्टचा वापर बंद करण्यात आला होता.

कोयना धरणातील भिंतीच्या लिफ्टमध्ये अडकला साप

ग्रीसमुळे साप पकडण्यात अडचणी-

घटनास्थळी दाखल झालेल्या सर्प मित्रांनी पाहणी केली असता, सापाला पकडण्यात अडचणी निर्माण होणार हे त्यांच्या लक्षात आले. अखेर त्यांना धरणाच्या भिंतीमधील तब्बल 200 पायर्‍या उतरून लिफ्टजवळ जावे लागले. साप अडचणीच्या ठिकाणी असल्यामुळे त्याला बाहेर काढणे अवघड होते. साप बिनविषारी धामण या जातीचा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्पमित्रांनी सापाला बाहेर काढण्याचे धाडस केले. परंतु, लिफ्टचे ग्रीस लागल्यामुळे साप त्यांच्या हातातून निसटत होता. साप हळूहळू खाली सरकत धरणाच्या भिंतीतील सर्वात खालच्या तळघरात गेला. त्यामुळे त्यांना चार मजले उतरून आणखी खाली जावे लागले. अखेर विकास माने या सर्पमित्राने तळघरातून सापाला पकडण्यात यश आले. त्यानंतर त्याला पिशवीत घालून सुरक्षितरित्या जंगलात सोडून देण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details