कराड (सातारा) - पोहायला गेलेल्या सहा वर्षांच्या मुलाचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना कराड तालुक्यातील वराडे गावात घडली. प्रीतम गणेश शिंदे, असे त्याचे नाव आहे. मृत प्रीतमचे कुटुंब मूळचे अकलूज (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील आहे. त्याचे आई-वडील काही दिवसांपासून वराडे गावातील एका हॉटेलमध्ये कामाला होते.
कराड : सहा वर्षांच्या मुलाचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू - karad latest news
पोहायला गेलेल्या सहा वर्षांच्या मुलाचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना कराड तालुक्यातील वराडे गावात घडली. प्रीतम गणेश शिंदे, असे त्याचे नाव आहे.
प्रीतम हा पोहायला कृष्णा नदीला गेला होता. त्यावेळी नदीत बुडून त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तळबीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मुलाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यासाठी कराड येथील लतिफ सय्यद, राजू पठाण आणि उंब्रज येथील बाबासाहेब चव्हाण यांना बोलावण्यात आले. त्यांनी प्रीतमचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. गेल्या काही दिवसांपासून त्याचे आई-वडील हे कामासाठी उंब्रज परिसरात आले होते. वराडे येथील एका हॉटेलमध्ये काम करत होते. या घटनेमुळे वराडे, उंब्रज परिसरावर शोककळा पसरली.