सातारा - एका कुटुंबातील कोरोनाबाधीत व्यक्तीच्या संसर्गामुळे पुसेगावच्या सेवागिरी विद्यालयातील सहा विद्यार्थ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद करण्यात आली आहे. शाळा पुन्हा कधी सुरू करायची याबाबतचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीच्या सोमवारी होणाऱ्या बैठकीत घेण्यात येणार आहे.
एका विद्यार्थीनीचे आजोबा पाॅझिटीव्ह -
या शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीचे आजोबा पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आल्यानंतर त्या संपूर्ण कुटुंबाची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यादरम्यान या विद्यार्थीनीला बाधा झाल्याचा अहवाल आला. शाळा सुरु झाल्यापासून शासनाच्या निर्देशानुसार कोरोना प्रसार रोखण्यासाठी या विद्यालयातर्फे दररोज सर्वप्रकारची दक्षता घेतली जात आहे. तरीही घरातील व्यक्तीद्वारे प्रसार झालेल्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेले या शाळेतील अन्य पाच विद्यार्थी बाधीत असल्याचे आढळून आले. दरम्यान, विद्यार्थ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटीव्ह आल्याने शाळा बंद करण्यात आली असल्याचे या शाळेच्या मुख्याध्यापिका चौगुले यांनी सांगितले. या सर्व विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसून त्यांची तब्येत ठणठणीत आहे, असेही त्यांनी सांगितले.
शाळेतर्फे विविध उपाययोजना -