सातारा - पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर एका चाारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये एकाच कुटुंबातील ७ जण ठार झाले आहेत, तर चालक गंभीर जखमी झाली आहे.
साताऱ्यात पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू - pune benglour highway
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर एका चाारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये एकाच कुटुंबातील ७ जण ठार झाले आहेत, तर चालक आणि लहान मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या काशीळ गावाजवळ हा अपघात झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी झाडाला धडकून हा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये 2 पुरुष 2 महिला, साडेतीन वर्षाचा एक लहान मुलगा व एक लहान मुलगी तसेच पाच वर्षाच्या एका मुलीचा समावेश आहे. निजामुद्दीन सौदागर असे कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे नाव आहे. कर्नाटकमधील धारवाड येथील हे कुटुंब असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
रात्री एक वाजण्याच्या सुमारास महिंद्रा कंपनीची चारचाकी (KA 25 MC 4359) ही कर्नाटहून मुंबईकडे चालली होती. गाडी काशीळ गांधीनगर याठिकाणी आल्यावर चालकाचा ताबा सुटल्याने गाडी झाडावर आदळली. यामध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सिव्हिल हॉस्पिटल सातारा या ठिकाणी हलवण्यात आले आहे. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.