सातारा- शेतकऱ्यांना फसविणारे दोन साखरसम्राट या निवडणुकीत उतरले आहेत. त्यांनी जिल्हा बँकेचे कर्ज बुडवले. आता हेच साखर सम्राट पदवीधरांचे शोषण करायला निघालेत, अशी टिका पुणे पदवीधरचे अपक्ष उमेदवार श्रीमंत कोकाटे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. पदवीधर मतदार संघ निवडणुकीबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्रीमंत कोकाटे यांनी आघाडी आणि सत्ताधारी पक्षांच्या दोन्ही पदवीधर उमेदवारांवर सडकून टीका केली.
हेही वाचा-पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकी संदर्भात चिंचवडमध्ये मेळावा
काटा काढण्यासाठी माझी उमेदवारी
श्रीमंत कोकाटे म्हणाले, की खरेतर कारखानदारांचे प्रश्न आणि पदवीधरांचे प्रश्न भिन्न आहेत. ज्यांनी ऊसाचा काटा मारला, त्यांचा काटा काढण्यासाठी मी उमेदवारी लढवीत आहे. पुणे पदवीधर मतदार संघातून भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा गोपुजचा हिंदुस्थान शुगर मिल हा साखर कारखाना आहे. तर महाविकास आघाडीचे पदवीधर उमेदवार अरुण लाड क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. दोन्ही उमेदवार सहकारी साखर कारखान्याशी निगडीत आहेत.
'शेतकऱ्यांना फसविणारे दोन साखरसम्राट या निवडणुकीत उतरले' हेही वाचा-महाविकास आघाडी सरकारमध्ये ताळमेळ नाही - देवेंद्र फडणवीस
जनता अशा काटा मारणाऱ्या साखरसम्राटांचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही, असा टोला देत श्रीमंत कोकाटे यांनी पदवीधर मतदारांना साद घातली.
न्याय हक्कांसाठी लढतोय-
पुणे पदवीधर मतदार संघाची ही निवडणुक आहे. यात बुद्धजीवी मतदान करणार आहेत. ही कोणत्या साखर कारखान्याची निवडणूक नाही. त्यांनी काटा मारून शेतकऱ्यांसह सरकारलाही फसवले. हे दोन साखर कारखानदार पदवीधरांचे शोषण करण्यासाठी निघाले आहेत. पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी ही निवडणुक मी लढवत आहे. ही निवडणूक साखर कारखाना किंवा जिल्हा परिषदेची निवडणूक नाही, अशी टिकाही त्यांनी केली.