कराड (सातारा) - कराड येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्टने सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५ लाखांची अर्थिक मदत दिली आहे. मदतीच्या रकमेचा धनादेश पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
मुख्यमंत्री सहाय्यत्ता निधीला श्री शिवाजी शिक्षण संस्थेकडून पाच लाखांची मदत - cm help fund for corona
कराड येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्टने सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५ लाखांची अर्थिक मदत दिली आहे.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था तसेच वैयक्तिक पातळीवर मुख्यमंत्री सहाय्यत्ता निधीसाठी मदत केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्टने मुख्यमंत्री निधीसाठी पाच लाखांच्या मदतीचा धनादेश पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्टचे अध्यक्ष जयंत पाटील, खजिनदार संजय बदीयानी, संचालक मानसिंगराव पाटील, राजेंद्र माने उपस्थित होते.