सातारा - श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी (Dnyaneshwar Maharaj Palkhi) सोहळ्याचा दि. २८ रोजी जिल्ह्यात प्रवेश होणार (on 28th June in Satara district) आहे. २८ जून ते दि. ४ जुलै या कालावधीत पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार लोणंदमध्ये अडीच दिवस तर फलटणमध्ये दोन दिवस पालखी मुक्कामी असेल. निरा पूल येथे दि. २८ जून रोजी पालखी सोहळ्याचा सकाळचा विसावा, दुपारचा नैवेद्य आणि रात्री लोणंदमध्ये मुक्काम असणार आहे. दि. २९ जून रोजी लोणंद येथे दुसरा मुक्काम, दि. ३० जून रोजी सोहळ्याचे लोणंद येथून प्रस्थान होईल.
Dnyaneshwar Maharaj Palkhi : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी २८ जूनला सातारा जिल्ह्यात - सातारा न्युज अपडेट
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा (Dnyaneshwar Maharaj Palkhi) दि. २८ रोजी जिल्ह्यात प्रवेश (on 28th June in Satara district) होणार आहे. ४ जुलै पर्यंत पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. असा आहे पालखी सोहळ्याचा कार्यक्रम...
नंतर चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण आणि दुपारचा विसावा तर रात्रीचा मुक्काम तरडगावमध्ये असेल. दि. १ जुलै रोजी तरडगाव येथून पालखीचे प्रस्थान होऊन दत्त मंदिर काळज येथे सकाळचा विसावा असेल. निंभेरे ओढा येथे दुपारचा नैवेद्य तर वडजल व फलटण दुध डेअरी येथे दुपारचा विसावा आहे. फलटण (विमानतळ) येथे रात्रीचा मुक्काम राहील. दि. २ जूलै रोजी फलटण (विमानतळ) येथेच सोहळ्याचा दुसरा मुक्काम राहील. दि. ३ जुलै रोजी फलटण येथून प्रस्थान झाल्यानंतर विडणी येथे सकाळचा विसावा. पिंपरद येथे दुपारचा नैवेद्य आणि निंबळक फाटा येथे विसावा तर रात्रीचा मुक्काम बरड येथे राहील.
दि. ४ जुलै रोजी बरड येथून सोहळ्याचे प्रस्थान होईल. साधुबुवाचा ओढा येथे सकाळचा विसावा असेल. धर्मपुरी पाटबंधारे बंगला कॅनालजवळ दुपाचा नैवेद्य. शिंगणपूर फाटा (पानसकरवाडी) येथे दुपारचा विसावा झाल्यानंतर पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल. रात्रीचा मुक्काम नातेपुते (जि. सोलापूर) येथे होईल. संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे प्रस्थान २१ जून रोजी होईल. यंदा पालखी सोहळ्यात तिथीची वृद्धी झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात रथापुढे २७ तर रथामागे २५१ नोंदणीकृत दिंड्या आहेत . तसेच नोंदणी नसलेल्या १२५ ते १५० दिंड्यांचा सहभाग असणार आहे.