महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना व्हायरस: श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधीचे मुखदर्शन आजपासून बंद..

श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिरात बुधवारी मुखदर्शन देण्यात येत होते. मात्र, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच तिर्थक्षेत्राच्या समित्यांना दिलेल्या आदेशानुसार आजपासून भाविकांना फक्त मंदिराचे बाहेरुन दर्शन घेता येणार आहे.

shri-brahmachaitanya-maharaj-samadhi-darshan-closed-from-today-due-to-corona
श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधीचे मुखदर्शन आजपासून बंद..

By

Published : Mar 19, 2020, 4:36 PM IST

सातारा- कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी म्हणून श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधीचे मुखदर्शन आजपासून बंद करण्यात आले. येथील भाविकांसाठीचा निवास व प्रसादाची व्यवस्था देखील पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आली आहे.

श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधीचे मुखदर्शन आजपासून बंद..

हेही वाचा-कोरोना : 31 मार्चपर्यंत मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा बंद

श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिरात बुधवारी मुखदर्शन देण्यात येत होते. मात्र, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच तिर्थक्षेत्राच्या समित्यांना दिलेल्या आदेशानुसार आजपासून भाविकांना फक्त मंदिराचे बाहेरुन दर्शन घेता येणार आहे. याशिवाय मंदिरातील अनुग्रह आणि अभिषेक देखील बंद ठेवण्यात आले आहेत. येत्या आठ एप्रिलला होणाऱ्या चैत्री पोर्णिमेचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. यानिमित्त भरणारी यात्रेलाही स्थगिती देण्यात आली आहे. भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन समाधी मंदिर समितीने केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details