महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्यातून 1300 मजुरांसह चौथी श्रमिक रेल्वे उत्तर प्रदेशकडे रवाना, आणखी सात रेल्वे धावणार

लॉकडाऊनमुळे उत्तर प्रदेशातील मजूर साताऱ्यात अडकले होते. या मजुरांना त्यांच्या राज्यात परत पोहोचवण्यासाठी साताऱ्यातून श्रमिक विशेष रेल्वे सोडण्यात आली. १,३०० मजुरांना घेऊन ही विशेष रेल्वे गुरुवारी सायंकाळी उत्तर प्रदेशला रवाना झाली.

shramik special train
साताऱ्यातून चौथी श्रमिक रेल्वे 1300 मजुरांसह उत्तर प्रदेशकडे रवाना, आणखी सात रेल्वे सोडण्यात येणार

By

Published : May 15, 2020, 10:10 AM IST

Updated : May 15, 2020, 12:00 PM IST

सातारा- लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत मजूर इतर राज्यांमध्ये अडकले आहेत. या मजुरांना घरी सोडण्यासाठी विशेष रेल्वे सोडण्यात येत आहे. हीच श्रमिक विशेष रेल्वे गुरुवारी सायंकाळी साताऱ्यातून १ हजार ३०० मजुरांना घेऊन उत्तर प्रदेशला रवाना झाली.

उत्तरप्रदेश शासनाच्या मंजुरीनंतर जिल्हा प्रशासनाने रेल्वेचे नियोजन केले. सातारा परिवहन विभागाच्या बसमधून मंजुरी मिळालेल्या कामगारांना रेल्वे स्थानकावर नेऊन रेल्वे तिकीटे देण्यात आली. प्रशासनाने त्यांची केलेली सुविधा आणि गावी जाण्याचा आनंद प्रत्येक मजुराच्या चेहऱ्यावर जाणवत होता. साताऱ्याच्या तहसीलदार आशा होळकर, जावळीचे तहसीलदार शरद पाटील यांच्यासह उपस्थित असलेल्या मान्यवरांबरोबरच रेल्वेत बसलेल्या मजुरांनीही टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. 'भारत माता की जय', 'शिवाजी महाराज की जय' असा जयघोष करत श्रमिक बांधवांनी साताऱ्याला निरोप दिला. प्रशासनाने प्रवासाची सोय करुन देऊन काळजी घेतल्याबद्दल प्रवाशांनी शासनाचे आभार मानले.

साताऱ्यातून 1300 मजुरांसह चौथी श्रमिक रेल्वे उत्तर प्रदेशकडे रवाना, आणखी सात रेल्वे धावणार
आतापर्यंत सातारा रेल्वेस्थानकातून 4 श्रमिक विशेष रेल्वे सोडण्यात आल्या. यामध्ये मध्य प्रदेश आणि राजस्थानकडे प्रत्येकी एक तर उत्तर प्रदेशकडे 2 श्रमिक विशेष रेल्वे सोडण्यात आल्या. जिल्ह्यातून आतापर्यंत 5 हजार परप्रांतीय मजुर हे श्रमिक विशेष रेल्वेच्या माध्यमातून आपल्या राज्यात परत गेले आहेत.
Last Updated : May 15, 2020, 12:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details