सातारा- भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी राष्ट्रवादीतील नेत्यांची गर्दी होत आहे. त्यापार्श्वभूमीवरच आज (बुधवार) राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा साताऱयात येत आहे. त्यातच साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे व विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे.
शिवस्वराज्य यात्रेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश जाधव यांनी... हेही वाचा - इंदापूरच्या जागेसाठी जयंत पाटलांचा कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला
खासदारकीचा राजीनामा देऊन उदयनराजे लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत, तर रामराजेदेखील भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सद्या सुरू आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेत ते सहभागी होतात की नाही याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
हेही वाचा - शिवस्वराज्य यात्रेत खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी घेतली शपथ; म्हणाले...