महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उध्दव ठाकरेंवरील टीकेच्या निषेधार्थ आशिष शेलारांचा कराडात निषेध - शिवसेना कराड

एनआरसी महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले होते. त्यावर बोलताना आशिष शेलारांनी तुझ्या बापाचे राज्य आहे का? अशा शब्दात टीका केली होती. यावरून शेलारांना टीकेला सामोरे जावे लागत आहे.

shivsena
आशिष शेलारांचा कराडमध्ये निषेध

By

Published : Feb 6, 2020, 2:28 AM IST

सातारा(कराड) - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शिवसेनेवर असंसदीय भाषेत टीका केल्याच्या निषेर्धात भाजप प्रवक्ते आ.आशिष शेलार यांच्याविरोधात कराडमध्ये शिवसैनिकांनी आंदोलन केले. शेलार यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

कराडमध्ये आशिष शेलारांचा निषेध

भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर असंसदीत भाषेत टीका केली होती. त्याचे पडसाद राज्यभर उमले. कराडमधील शिवसेना पदाधिकार्‍यांनी आ. शेलार यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत शेलार यांच्या प्रतिमेला जोडे मारले. तसेच त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आशिष शेलार हे महाराष्ट्रात जिथे जातील, तिथे त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशाराही यावेळी शिवसेना पदाधिकार्‍यांनी दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details