महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चारा छावण्यांमधील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी - शिवसेना - Feed camp satara

जुलै महिन्याच्या अखेरीस बहुतांशी छावण्या बंद झालेल्या असताना ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये छावण्या सुरू असल्याचे दाखविण्यात आले आहे. या दोन्ही महिन्यांची बिले अदा करताना अर्थपुर्ण व्यवहार झाले आहेत. या दोन्ही महिन्यांचे छायाचित्रण तपासण्यात यावे अशी आमची मागणी आहे.

चारा छावण्यांमधील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी - शिवसेना
चारा छावण्यांमधील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी - शिवसेना

By

Published : Aug 19, 2020, 3:50 PM IST

सातारा - माण खटाव तालुक्यातील चारा छावण्यांची बिले अदा करताना त्यात भ्रष्टाचार झाला आहे. याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख संजय भोसले यांनी केली आहे. आज (बुधवारी) येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संजय भोसले म्हणाले, की शासनाने छावण्या मंजूर करताना तसेच त्या चालविण्यासाठी अनेक नियम व अटी छावणी चालकांना घातल्या होत्या. नियमानुसार चोवीस तास सीसीटीव्ही चालू ठेवणे व त्याचे छायाचित्रण बिलांसोबत सादर करणे बंधनकारक होते. मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे छायाचित्रण सादर केलेले नाही. जुलै महिन्याच्या अखेरीस बहुतांशी छावण्या बंद झालेल्या असताना ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये छावण्या सुरू असल्याचे दाखविण्यात आले आहे. या दोन्ही महिन्यांची बिले अदा करताना अर्थपुर्ण व्यवहार झाले आहेत. या दोन्ही महिन्यांचे छायाचित्रण तपासण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

संजय भोसले म्हणाले चारा छावण्यांची बिले ज्या संस्थांच्या नावे काढण्यात आली, त्या संस्थांच्या खात्यातून कर्मचार्यांच्या नातेवाईकांच्या खात्यावरती लाखो रुपये वर्ग झाले आहेत. तसेच शासकीय कर्मचार्यांनी जनावरांच्या संख्येबाबतचा अहवाल प्रत्यक्ष छावणीवर जावून न करता एकाच ठिकाणी बसून तयार केले आहेत. हा सर्व प्रकार गंभीर असून याची जिल्हाधिकारी यांनी गंभीर दखल घेवून सखोल चौकशी करावी. याची चौकशी न केल्यास पुढील कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा इशारा भोसले यांनी दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details