सातारा- छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला यमसदनी धाडले तो दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो. त्या शौर्यगाथेची आठवण म्हणून प्रतापगडावर दरवर्षी मोठा उत्सव साजरा केला जातो.यंदाचा शिवप्रताप दिन शासनाच्या वतीने साजरा करण्यात आला. मात्र, कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर साध्या आणि कमीत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.
आज शिवप्रताप दिन; किल्ले प्रतापगडावर शासनाच्या वतीने छत्रपती शिवरायांना अभिवादन - किल्ले प्रतापगडाचा रणसंग्राम
किल्ले प्रतापगडावर आज शासनाच्या वतीने शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत या सोहळा पार पडला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा शिवप्रताप दिन साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी यापूर्वीच दिल्या होत्या. तसेच शिवप्रताप दिनानिमित्त शहर व जिल्ह्यात आयोजित करण्यात येणारे इतर सर्व कार्यक्रमही रद्द करण्यात आले होते. केवळ शासकीय कार्यक्रमास परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार आज किल्ले प्रतापगडावर शिवप्रतापदिन अत्यंत साधेपणाने व उत्साहात साजरा झाला. यावेळी अधीक्षक अजयकुमार बन्सल, वाईच्या प्रांताधिकारी संगिता राजापूरकर -चौगुले, महाबळेश्वर पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे आदी शासकीय अधिकारी उपस्थित होते.