महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परप्रांतीय गेले.. आता भूमिपुत्रांनी रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा; शिवेंद्रसिंहराजेंचे आवाहन - शिवेंद्रसिंहराजे भोसले न्यूज

कोरोनामुळे परप्रांतीय मजूर- कामगार त्यांच्या गावी गेले आहेत. यामुळे स्थानिक बेरोजगार तरुणांनी, कामगारांनी एमआयडीसीमध्ये उपलब्ध नोकरीच्या संधी शोधून त्या मिळवल्या पाहिजेत, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

Shivendrasinhraje Bhonsle appeal
शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे आवाहन

By

Published : May 15, 2020, 9:55 AM IST

सातारा- लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील परप्रांतीय मजूर- कामगार त्यांच्या राज्यात परत गेले आहेत. सातारा एमआयडीसीतील कंपन्या सुरू झाल्या आहेत. परप्रांतीयांच्या जाण्याने रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांनी या संधीचे सोने करून विविध कंपन्यांमध्ये आपल्या शैक्षणिक अहर्तेनुसार नोकरी मिळवावी आणि बेरोजगारीला आळा घालावा, असे आवाहन साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.

रोजगार उपलब्ध नाही, नोकरी मिळत नाही, परप्रांतातील कामगारांमुळे एमआयडीसीत स्थानिकांना नोकरी नाही. त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगारासाठी पुणे, मुंबईवर अवलंबून रहावे लागते. आज परिस्थिती वेगळी आहे. कोरोना महामारीमुळे मजूर-कामगार आपापल्या राज्यांत परत जात आहेत. साताऱ्यातूनही हजारो परप्रांतीय त्यांच्या राज्यात परत गेले आहेत. त्यामुळे सातारा एमआयडीसीतील विविध कंपन्यांमध्ये टर्नर, फिटर, हेल्पर, मशीन ऑपरेटर, गवंडी, सुतार अशा अनेक पदांच्या असंख्य जागा रिक्त झाल्या आहेत. विविध ट्रान्सपोर्ट कंपन्यांमध्ये वाहन चालक म्हणून नोकरीची संधी निर्माण झाली आहे. ही चालून आलेली संधी स्थानिक भूमिपुत्रांनी सोडू नये, असे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी मिळत नाही, बेरोजगारी वाढली असे म्हणण्यापेक्षा आता बेरोजगारी संपुष्टात आणण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे स्थानिक बेरोजगार तरुणांनी, कामगारांनी एमआयडीसीमध्ये उपलब्ध नोकरीच्या संधी शोधून त्या मिळवल्या पाहिजेत. कंपन्यांनाही कामगारांची गरज आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details