महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्यात प्रशासनाने लावलेली टाळेबंदी अन्यायकारक; निर्बंध शिथिल करण्याची शिवेंद्रसिंहराजेंची मागणी - satara lockdown

सातारा जिल्ह्यातील लाॅकडाऊनच्या निर्णयामुळे व्यावसायिक, शेतकरी सर्वसामान्यांचे नुकसान होत आहे. हा अन्याय असून प्रशासनाने टाळेबंदी ताबडतोब शिथिल करावी अन्यथा हा विषय अधिवेशनात मांडू, असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज माध्यमांशी बोलताना दिला.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

By

Published : Jul 5, 2021, 12:46 AM IST

सातारा - सातारा जिल्ह्यातील लाॅकडाऊनच्या निर्णयामुळे व्यावसायिक, शेतकरी सर्वसामान्यांचे नुकसान होत आहे. हा अन्याय असून प्रशासनाने टाळेबंदी ताबडतोब शिथिल करावी अन्यथा हा विषय अधिवेशनात मांडू, असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज माध्यमांशी बोलताना दिला.

साताऱ्यात प्रशासनाने लावलेली टाळेबंदी अन्यायकारक

प्रशासनाने निर्बंध मागे घ्यावेत

"जिल्ह्यात शनिवार-रविवार होत असलेले लाॅकडाऊन सहन करता येईल. पण सातही दिवस टाळेबंदीमुळे होणारे सर्वसाम‍न्यांचे निकसान न भरुन येणारे व अन्यायकारक आहे. साताऱ्यात व्यापारी व सर्वसामान्यांचा नव्याने लावलेल्या टाळेबंदीला पूर्ण विरोध होत आहे. एक आठवडा शिथील केलेले निर्बंध कोरोना रूग्ण वाढल्याने प्रशासनाने पुन्हा लागू केले, हे अन्यायकारक आहे. प्रशासनाने निर्बंध मागे घ्यावेत. कडक टाळेबंदी करु नये, अशी भूमिका आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकारासमोर मांडली.

'त्या' आदेशाची अंमलबजावणी नाही

उपमुख्यमंत्री अजितदादा, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या सुचनांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. मी अधिवेशनात मुद्दा मांडणार आहे, असे सांगून शिवेंद्रसिंहराजेंनी प्रशासनाच्या या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, "प्रशासनाचे निर्बंध आठवडाभरच शिथील झाले होते. त्यामुळे व्यावसायिक, शेतकरी यांना संधी मिळाली होती. तीही आता गेली आहे. त्यामुळे प्रशासनाने घेतलेल्या कडक लॉकडाऊनच्या निर्णयाला सगळय़ांचा विरोध आहे. काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला विरोध दर्शवला, काहीनी आंदोलन करुन विरोध व्यक्त केला. जिल्हा प्रशासनाला माझी एकच विनंती राहील, त्यांनी टाळेबंदी मागे घ्यावी. वेळेचे निर्बंध ठेवा परंतु कडक टाळेबंदी करु नका. दोन दिवसाची कडक टाळेबंदी करावी."

बाधितांच्या आकड्याबाबत शंका

पुण्यासारख्या शहरात रुग्ण संख्या वाढत नाही आणि साताऱ्यासारख्या लोकसंख्येने विरळ असलेल्या शहरात रुग्णसंख्या वाढत आहे हे प्रशासनाचे अपयश आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कोरोना बाधितांच्या प्रशासनाकडून जाहीर होणाऱ्या आकड्यांवर त्यांनी शंका व्यक्त केली. "तपासणी केंद्रावरमध्ये तपासणी नंतर त्याच्या नोंदीबाबत फेरफार होत असल्याने व वेळच्यावेळी त्याची नोंद होत नसल्याने संख्या वाढताना दिसत आहे. प्रशासनाने सर्व प्रतिनिधींशी चर्चा करुन निर्णय घ्यावा. पाच दिवसांमध्ये वेळेत दुकाने सुरु करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details