सातारा - कोरोनाची महामारी सुरू झाल्यापासून तीन महिने लॉकडाऊन सुरु होता. सर्वकाही बंद असल्याने असंख्य लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. कोरोनापासून बचावासाठी लॉकडाऊन हा उपाय नाही हे स्पष्ट झाले आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने 17 जुलै ते 26 जुलै असा 10 दिवसांचा लॉकडाऊन पुन्हा ठेवला होता. या लॉकडाऊनचे काटेकोर पालन नागरिकांनी केले. त्यामुळे आता नव्याने सुरू केलेल्या लॉकडाऊनचा फेरविचार जिल्हा प्रशासनाने करावा. लॉकडाऊनच्या आधी सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत जशी सर्व दुकाने सुरु होती, तशीच शिथिलता या लॉकडाऊनमध्ये द्यावी, अशी मागणी आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.
प्रसिध्द केलेल्या पत्रकात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे संपुर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोना साथ सुरू झाली तेव्हापासून सातारा जिल्ह्यात सुमारे तीन महिने सर्वकाही बंद होते. यामुळे मोलमजुरी, रोजंदारी करणाऱ्या गोर- गरीब लोकांचे अतोनात हाल झाले. असंख्य लोकांची उपासमार झाली. लॉकडाऊन उठल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे सातारकर नागरिकांसह संपुर्ण जिल्ह्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला होता. वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुन्हा 17 ते 26 जुलै असा 10 दिवसांचा लॉकडाऊन केला. याचे जनतेने काटेकोर पालन केले. प्रशासनाला पुर्ण सहकार्य करणाऱ्या जनतेवर जिल्हा प्रशासनाने पुन्हा लॉकडाऊन लादला. सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. वेळेची मर्यादा असल्याने गर्दी होत असून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे.
जिल्हा प्रशासनाने नव्याने सुरु केलेल्या लॉकडाऊनचा फेरविचार करावा- शिवेंद्रसिंहराजे भोसले
नव्याने सुरू केलेल्या लॉकडाऊनचा फेरविचार जिल्हा प्रशासनाने करावा. लॉकडाऊनच्या आधी सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत जशी सर्व दुकाने सुरु होती, तशीच शिथिलता या लॉकडाऊनमध्ये द्यावी, अशी मागणी आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.
शिवेंद्रसिंहराजे भोसले
कोरोनाला रोखण्याबरोबरच जनजीवन पुर्वपदावर येण्यासाठी सर्व दुकाने सुरु असणे अत्यावश्यक आहे आणि ही काळाची गरज असल्याचे भोसले म्हणाले.