सातारा - राज्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी आहे. यामुळे बैलगाडा शर्यत संघटना नाराज झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा-जावळीमधील बैलगाडा संघटनांच्या सदस्यांनी भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली.
भेटीत काय म्हणाले शिवेंद्रसिंहराजे भोसले?
राज्यात बैलगाडा शर्यती सुरू होण्याबाबत यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच विरोधी पक्षनेत्यांची भेट घेणार असल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले. या भेटीदरम्यान त्यांना बैलगाडा शर्यती सुरू कराव्या, अशी मागणी केली जाईल. या शर्यतींमध्ये कुणी व्यावसायिक नाही तर शेतकरी वर्ग सहभागी हाेत असताे. तसेच या शर्यतींचे ग्रामीण भागाशी एक वेगळं नाते असल्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी नमूद केले. आधी बैलगाडा शर्यती हाेत असत. मात्र, पेटा संस्थेच्या याचिकेनंतर काही निर्णय घेतले गेले. यामुळे या शर्यती थांबल्या आहेत, असेही ते म्हणाले.