महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shivendra Raje Bhosale: पालिकेची निवडणूक आल्याने उदयनराजेंची दिल्लीत नौटंकी; शिवेंद्रराजेंचा टोला - शिवेंद्रराजे मराठी बातमी

पालिकेची निवडणूक जवळ आल्याने उदयनराजे यांची दिल्लीत निवेदने देत फोटोसेशन करण्याची नौटंकी सुरु झाली, असा टोला शिवेंद्रारजेंनी लगावला ( Shivendra Raje Bhosale Taunt Udayanraje Bhosale ) आहे.

udayanraje bhosale Shivendra Raje Bhosale
udayanraje bhosale Shivendra Raje Bhosale

By

Published : Jul 28, 2022, 3:08 PM IST

Updated : Jul 28, 2022, 3:15 PM IST

सातारा - सातारा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात कलगीतुरा सुरू झाला आहे. उदयनराजे भोसले सातार्‍याच्या विकासाच्या प्रश्नांवर दिल्लीत विविध खात्याच्या मंत्र्यांच्या भेटी घेत आहेत. त्यावरून शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंची दिल्लीत नौटंकी सुरू असल्याचा टोला लगावला ( Shivendra Raje Bhosale Taunt Udayanraje Bhosale ) आहे. त्याला उदयनराजेंनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'कास धरणाची उंची वाढली, पण यांच्या विचारांची उंची कधी वाढणार,' असा खोचक सवाल उदयनराजेंनी केला आहे. दोन्ही राजेंमधील टीका-टीपण्णीमुळे सातार्‍यातील राजकीय वातावरण ऐन पावसाळ्यात तापले आहे.

'सातारकरांना कासचे पाणी फक्त पाहावे लागणार' - शिवेंद्रराजे म्हणाले की, कास धरणाची उंची वाढवण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे निधी मिळाला. निधी संपल्यामुळे या प्रकल्पाचे काम रखडले. त्यावेळीही मी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून वाढीव निधी मिळवून दिला. आता या प्रकल्पाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. असे असताना वाढीव पाईपलाईनचा पत्ताच नाही. त्यामुळे सातारकरांना कासचे वाढीव पाणी फक्त पाहावेच लागणार आहे. याला पालिकेचा नियोजनशून्य आणि भ्रष्ट कारभार जबाबदार आहे. पालिकेची निवडणूक जवळ आल्याने उदयनराजे यांची दिल्लीत निवेदने देत फोटोसेशन करण्याची नौटंकी सुरु झाली असल्याची टीका शिवेंद्रराजेंनी केली आहे.

'सातारकरांचा पैसा लुटण्याचा एककलमी कार्यक्रम...' -विकासाची खोटी स्वप्ने दाखवण्याचे दिवस आता संपले असून सातारकरांना जाब देण्याची वेळ आली आहे, असे म्हणत शिवेंद्रराजे यांनी म्हटलं की, नगरपालिकेतील मनमानी, नियोजनशून्य आणि भ्रष्ट कारभाराने कळस गाठला आहे. टेंडर, टक्केवारी, कमिशन यासाठी एकमेकांचे गळे धरून, मारामार्‍या करून पालिकेला भ्रष्टाचाराचे कुरण बनविले आहे. मागील पाच वर्षे पालिकेचा आणि सातारकरांचा पैसा लुटण्याचा एककलमी कार्यक्रम पालिकेत सुरु होता. आता निवडणूक आल्यामुळे मंजूर नसलेल्या, न होणार्‍या आणि दुसर्‍याने केलेल्या कामांचे नारळ फोडायचे, मुंबई, दिल्लीवारी करून मंत्र्यांच्या भेटी घेवून निवेदन द्यायचे आणि फोटोसेशन करून सातारकरांना भुलवायचे प्रकार जोमाने सुरु असल्याची टीका शिवेंद्रराजेंनी केली आहे.

'कचर्‍यात पैसे खाऊन नगरपालिकेचा बाजार केला' - सत्तारूढ आघाडीतील नगरसेवकांच्या टेंडर, कमिशन आणि टक्केवारीसाठी लागणार्‍या कळवंडी सातारकरांनी उघड्या डोळ्यांनी पाहायल्या. डीडीटी पावडरच नव्हे तर कचर्‍यात पैसे खाण्याची जणू स्पर्धाच सुरु होती. भ्रष्टाचारमुक्त कारभाराचा डांगोरा पिटून सातारकरांना भावनिक करून पालिकेची सत्ता मिळवून पालिकेचा अक्षरश: बाजार करून टाकला. नगरपालिकेला लुटून खाणारे निवडणूक आली की फोटोसेशन करून विकासाची खोटी स्वप्ने रंगवत आहेत. कास धरणाची उंची वाढली, पण सातारकरांना वाढीव पाणी मिळणार नाही. हे पाप तुम्ही केले आहे. आता तुमच्या पापाचा घडा भरला असून, सुज्ञ सातारकर तुम्हाला चांगला धडा शिकवतील, असा इशारा आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी दिला आहे.

हेही वाचा -Threat Swapna Patkar : शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय स्वप्ना पाटकर यांना धमकी

Last Updated : Jul 28, 2022, 3:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details