सातारा- पक्षातील अतिउत्साही पदाधिकारी-कार्यकर्त्यांमुळे विरोधकांना पक्षनेतृत्वावर चिखलफेक करण्याची संधी मिळते. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी अशा अतिउत्साहींना आवर घालावा. तसेच संबंधीत पुस्तकाचे वितरण थांबवावे, अशी मागणी साताऱ्याच्या छत्रपती घराण्यातील वंशज आणि भाजपचे साताऱ्यातील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पुस्तकात केल्याने उठलेल्या वादाच्या अनुषंगाने आमदार भोसले यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ते आज साताऱ्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे आणि कोणत्याच थोर पुरुषाची, स्वातंत्र्य लढ्यातील विभुतींची इतरांबरोबर तुलना करने योग्य होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा वेगळी आहे. त्यांनी ती स्वत: निर्माण केली आहे. त्यांनी काम करुन देशवासियांचा विश्वास संपादन केला आहे. भारताची जगभरात प्रतिमा उंचावण्यात ते यशस्वी झालेत, याचा अनुभाव भारतीय नागरिक म्हणून आपण घेतोय. त्यामुळे पक्षात काही अतिउत्साही पदाधिकारी-कार्यकर्ते असतात. त्यांच्यामुळे पक्षनेतृत्वावर चिखलफेक करण्याची संधी विरोधकांना मिळते. त्यामुळे पक्षश्रेष्ठींना विनंती आहे की अशा अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवर घालावा. त्यांना योग्य ती समज द्यावी, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
त्या पुस्तकाचं वितरण थांबवावे-