सातारा- माण तालूक्यातील बोथे या गावातील महिलेने केलेल्या तक्रारीवरून दाखल खटल्यात खटावचे नेते शेखर गोरे यांची वडूज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. काही दिवसापूर्वी शरद पवार यांच्या फलटणमधील सभेत गोंधळ घातल्याने ते चर्चेत आले होते.
पवार यांच्या सभेत गोंधळ घालणाऱ्या गोरेची बोथे प्रकरणातून निर्दोष मुक्तता - अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात अपील
माण तालूक्यातील बोथे या गावातील महिलेने केलेल्या तक्रारीवरून दाखल खटल्यात खटावचे नेते शेखर गोरे यांची वडूज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. काही दिवसापूर्वी शरद पवार यांच्या फलटणमधील सभेत गोंधळ घातल्याने ते चर्चेत आले होते.
७ जानेवारी २०१३ रोजी खोकडे येथील (गट नंबर १४७) मध्ये पवनचक्की कंपनीमार्फत रस्त्याचे काम चालू होते. त्यावेळी कस्तुरबाई अंकुश घाडगे यांनी शेखर गोरे व अन्य दोघांवर पोलीस ठाण्यात बेकायदेशीर धामकावणे व जीवे मारण्याची धमकी देणे, अशा प्रकारची फिर्याद दिली होती. या प्रकरणाची दहिवडी येथील न्यायालयात सुनावणी झाली होती. त्यावेळी न्यायालयाने गोरे यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्या शिक्षेविरोधात गोरे यांनी वडूज येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल केली होती. त्या अपिलाची सुनावणी आज झाली. या प्रकरणात न्यायाधीश आर. के मलाबादे यांनी शेखर गोरे यांची निर्दोष मुक्तता केली आहे.